ETV Bharat / city

कोरोनाचा हायव्होल्टेज इफेक्ट, वीजबिल आकारणी पद्धत बदलणार - janata curfew in india

23 मार्चपासून मीटर रिडींग करण्यासाठी व बिलाचे वितरण करण्यासाठी ग्राहकांच्या घरी पुढील आदेश येईपर्यंत जाऊ नये. या काळात मीटर रिडींग न झाल्यामुळे ग्राहकांना सरासरी बिल पाठविण्याची सूचना त्यांनी दिली. या काळात वीज बिलाची छपाई होणार नाही. मात्र, वेबसाईटवर बिले उपलब्ध राहतील.

वीजबिल आकारणी पद्धत बदलणार
वीजबिल आकारणी पद्धत बदलणार
author img

By

Published : Mar 22, 2020, 8:19 PM IST

मुंबई - कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी महावितरणला आपल्या दैनंदिन कार्यपद्धतीत बदल करण्याचे आदेश राज्याचे उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज दिले असून ग्राहकांशी रोजचा होणारा संपर्क टाळण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत.

23 मार्चपासून मीटर रिडींग करण्यासाठी व बिलाचे वितरण करण्यासाठी ग्राहकांच्या घरी पुढील आदेश येईपर्यंत जाऊ नये. या काळात मीटर रिडींग न झाल्यामुळे ग्राहकांना सरासरी बिल पाठविण्याची सूचना त्यांनी दिली. या काळात वीज बिलाची छपाई करण्यात येणार नाही. मात्र, महावितरणच्या वेबसाईटवर बिले उपलब्ध करून देण्यात यावी, असेही त्यांनी आदेश दिले आहेत. सोबतच ग्राहकांनी महावितरणकडे नोंदविलेल्या मोबाईल नंबरवर बिलासंबंधीचे एसएमएसद्वारे संदेश पाठविण्यात येणार आहे.

या कालावधीत थकबाकीसाठी ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित न करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. वीजचोरी व बिलासंबंधीच्या तक्रारीला अनुसरून ग्राहकांच्या घरी महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी भेटी देऊन तपासणी करू नये, अशा सूचना डॉ. राऊत यांनी महावितरण प्रशासनाला दिल्या आहेत.

हेही वाचा - महाबळेश्वर, पाचगणी नगरपरिषद हद्दीतील अनिवासी व्यक्तींना उद्या 12 पर्यंत जिल्हा सोडण्याचे आदेश

हेही वाचा - जनता कर्फ्यू : भूकने व्याकुळ मनोरुग्ण महिलेस मिळाला मदतीचा हात

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.