ETV Bharat / city

Election Commission : मतदानाच्या जागरासाठी लोकगीतांची स्पर्धा, हजारोंची बक्षिसे - निवडणुक आयोग लोकगीतांची स्पर्धा

राज्यातील ग्रामपंचायत निवडणुका देखील पुढील काही दिवसातच पार पडणार आहेत, त्या निमित्ताने लोकशाहीचा जागर (Election Commission Folk Songs Competition) करण्याचा उपक्रम निवडणूक आयोगाने आखला आहे. निवडणूक आयोगाने महाराष्ट्र स्तरावरील स्पर्धा आयोजित केली आहे. सविस्तरपणे लोकगीतातुन लोकशाहीचा जागर जाणून (Folk song competition for Democracys Awareness) घेऊया.

Folk Songs Competition in Maharashtra
लोकगीतांची महाराष्ट्रात स्पर्धा
author img

By

Published : Sep 27, 2022, 4:30 PM IST

मुंबई : लोकगीत आपल्या महाराष्ट्राची आणि भारताची एक मोठी सांस्कृतिक परंपरा आहे. ही शेतकरी, कष्टकरी मजूर काम करताना सुचलेल्या काव्यातून कलेतून विचार व्यक्त करतो. मानव समाजाचा इतिहास स्वतःचे समाजाचे सुखदुःख सांगण्याचा प्रयत्न करतो, आणि त्यातूनच लोकगीतांची परंपरा पुढे समृद्ध झाली. छत्रपती शिवाजी महाराजांवर अनेक पोवाडे, लोकगीत रचले (Election Commission Folk Songs Competition) गेले.

महाराष्ट्रामध्ये लोकगीतांची मोठी परंपरा आहे. वासुदेवाची गाणी, गोकुळीचा चोर, गोंधळ, भीम गीते लोकगीते, भोंडल्याची गाणी, तमाशा, पोवाडा ,भजन, कीर्तन, भारुड अशी समृद्ध महाराष्ट्राची लोककला आहे. राज्यातील ग्रामपंचायत निवडणुका देखील पुढील काही दिवसातच पार पडणार आहेत. त्या निमित्ताने लोकशाहीचा जागर करण्याचा उपक्रम निवडणूक आयोगाने आखला आहे. निवडणूक आयोगाने महाराष्ट्र स्तरावरील स्पर्धा आयोजित केली आहे. सविस्तरपणे लोकगीतातुन लोकशाहीचा जागर जाणून घेऊया.

Folk Songs Competition in Maharashtra
लोकगीतांची महाराष्ट्रात स्पर्धा
मतदानासाठी जनजागृती -
राज्यात शेकडो ग्रामपंचायतींच्या निवडणुका पुढील काही दिवसात होणार आहेत. राजकीय रणधुमाळी सुरू झालेली आहे. मात्र मतदारांनी लोकशाही मूल्यांच्या आधारे मतदान करून लोकप्रतिनिधींवर दबाव निर्माण होईल, या रीतीने मतदानाचा अधिकार बजावला पाहिजे. कोणत्याही आमिषाला बळी न पडता आपलं निर्भीड मत दिल पाहिजे. त्यासाठी निवडणूक आयोगाने हा उपक्रम सुरू केलाय. महाराष्ट्रात विदर्भ, मराठवाडा, खानदेश, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र आपापल्या प्रांतानुसार लोकगीते विपुल प्रमाणात (Folk song competition for Democracys Awareness) आढळतात.

मतदारांनी आपला हक्क बजावला पाहिजे, आणि त्यासाठी कुठल्याही आमिषाला बळी न पडता संविधानिक मतदानाचे काम चोख बजावले पाहिजे. आपल्याला मिळालेल्या अधिकारामुळेच लोकप्रतिनिधींवर दबाव कसा निर्माण होईल ? खऱ्या अर्थाने लोकांची, लोकशाही कशी समृद्ध होईल ? त्यासाठी निवडणूक आयोगाने ही महाराष्ट्र स्तरावर स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे. स्पर्धेमध्ये एकल म्हणजे सोलो आणि समूह म्हणजे ग्रुप दोन्ही प्रकारचे लोकगीत महाराष्ट्रातील जनतेला सहभागी होता येईल, आणि लोकगीत पाठवता येतील.

अर्ज असा करावा -समूहगीत पाठवताना अर्ज एकाच स्पर्धकाच्या नावे भरायला हवा. स्पर्धेसाठी लोकशाही निवडणूक मताधिकार आधार जोडणे, या विषयावर लोकगीत गाऊन प्राची ध्वनिचित्रवीत अर्थात व्हिडिओ पाठवावा. त्यासोबत नृत्य केले असेल तरी चालेल. एका स्पर्धकाने किंवा एका समूहाने एकच गीत पाठवावे. आपल्या गीताची ध्वनिचित्र फीत पाठवताना तिची वेळेची मर्यादा आहे. कमीत कमी दोन मिनिटे जास्त पाच मिनिटे. ध्वनी चित्रफितीची म्हणजे व्हिडिओची साईज जास्तच जास्त 500 एमबी असावी. आणि ती mp4 फॉरमॅटमध्ये (Folk Songs Competition) असावी.

ध्वनीचित्रफीत व्हिडिओ गुगलवर अर्ज करताना जोडते वेळी, त्या व्यक्तीचे किंवा मंडळाचे नाव त्याचा लोगो येणार नाही याची काळजी घ्यावी. अन्यथा अर्ज स्पर्धेतून बाद केला जाईल. लोकशाही व निवडणूक आणि मताधिकार आधार जोडणे, या विषयांवर लोकगीत पाठवणाऱ्या स्पर्धकांचा अर्ज ग्राह्य धरला जाईल. अर्ज आणि ध्वनी चित्रफित पाठवण्यासाठी खालील गुगल अर्जावर माहिती भरून पाठवावी. https://forms.gle/hRoUEKUEb6bT2x4g9 यासाठी निवडणूक आयोगाकडे दोन्ही चित्रफीत पाठवताना अडचण आली, तर त्यांनी (8669058325 -प्रवीण सलगकर, 9987975553- तुषार पवार) प्रतिनिधींकडे व्हाटसपवर संपर्क साधावा.

स्पर्धेचे बक्षिसं - ही स्पर्धा 26 ऑक्टोबर नुकतीच सुरू करण्यात आली असून 31 ऑक्टोबर 2022 पर्यंत असेल. 31 ऑक्टोबरनंतर आलेले कुठलेही साहित्य स्पर्धेसाठी ग्राह्य धरले जाणार नाही. लोकगीत बोली भाषेमध्ये असेल तरी चालेल गुगलवर अर्ज करताना त्याचा मराठीत अनुवाद करून पाठवावा. या स्पर्धेसाठी बक्षीस पुढील प्रमाणे समूह लोकगीत पहिला क्रमांक 21,000 दुसरा क्रमांक 11,000 तिसरा क्रमांक पाच हजार उत्तेजनार्थ 1,000 एकल लोकगीत पहिला क्रमांक सात हजार, दुसरा क्रमांक 5,000 तिसरा क्रमांक 3,000 रुपये उत्तेजनार्थ पाचशे रुपयाची एकूण दहा बक्षिसे असतील. या स्पर्धेमध्ये मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय महाराष्ट्र यांच्यातर्फे प्रमाणपत्र देण्यात येईल. समूहामध्ये जास्तीत जास्त पंधरा व्यक्तींचा समावेश असावा. त्यापेक्षा अधिक व्यक्तींचा समावेश असला, तर त्यांना प्रमाणपत्र दिले जाणार (Democracy Awareness Election Commission) नाही.

नियमावली - विजेत्यांना बक्षिसाची रक्कम प्रमाणपत्र आणि मानचिन्ह निवडणूक आयोगाकडे देण्यात येईल. आलेल्या लोकगीतांमधून सर्वोत्तम गीते निवडण्याचा तसेच स्पर्धेच्या नियमांमध्ये बदल करण्याचा अंतिम निर्णय परीक्षक आणि आयोजक यांच्याकडे राहील. स्पर्धकाने पाठवलेल्या साहित्यावर अन्य कोणी स्वामित्व हक्क सांगितल्यास त्याची पडताळणी करण्याची जबाबदारी सदर स्पर्धकाची असेल. स्पर्धेतील उत्कृष्ट साहित्य मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या समाज माध्यमांवर प्रसारित केले जाईल, निवडणूक कार्यालयात कार्यरत कर्मचारी अधिकारी सदर स्पर्धेत सहभाग घेऊ शकतात. मात्र त्यांच्या साहित्याचा बक्षेसाठी विचार केला जाणार नाही. अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे महाराष्ट्र यांनी (Election Commission) दिली.

मुंबई : लोकगीत आपल्या महाराष्ट्राची आणि भारताची एक मोठी सांस्कृतिक परंपरा आहे. ही शेतकरी, कष्टकरी मजूर काम करताना सुचलेल्या काव्यातून कलेतून विचार व्यक्त करतो. मानव समाजाचा इतिहास स्वतःचे समाजाचे सुखदुःख सांगण्याचा प्रयत्न करतो, आणि त्यातूनच लोकगीतांची परंपरा पुढे समृद्ध झाली. छत्रपती शिवाजी महाराजांवर अनेक पोवाडे, लोकगीत रचले (Election Commission Folk Songs Competition) गेले.

महाराष्ट्रामध्ये लोकगीतांची मोठी परंपरा आहे. वासुदेवाची गाणी, गोकुळीचा चोर, गोंधळ, भीम गीते लोकगीते, भोंडल्याची गाणी, तमाशा, पोवाडा ,भजन, कीर्तन, भारुड अशी समृद्ध महाराष्ट्राची लोककला आहे. राज्यातील ग्रामपंचायत निवडणुका देखील पुढील काही दिवसातच पार पडणार आहेत. त्या निमित्ताने लोकशाहीचा जागर करण्याचा उपक्रम निवडणूक आयोगाने आखला आहे. निवडणूक आयोगाने महाराष्ट्र स्तरावरील स्पर्धा आयोजित केली आहे. सविस्तरपणे लोकगीतातुन लोकशाहीचा जागर जाणून घेऊया.

Folk Songs Competition in Maharashtra
लोकगीतांची महाराष्ट्रात स्पर्धा
मतदानासाठी जनजागृती - राज्यात शेकडो ग्रामपंचायतींच्या निवडणुका पुढील काही दिवसात होणार आहेत. राजकीय रणधुमाळी सुरू झालेली आहे. मात्र मतदारांनी लोकशाही मूल्यांच्या आधारे मतदान करून लोकप्रतिनिधींवर दबाव निर्माण होईल, या रीतीने मतदानाचा अधिकार बजावला पाहिजे. कोणत्याही आमिषाला बळी न पडता आपलं निर्भीड मत दिल पाहिजे. त्यासाठी निवडणूक आयोगाने हा उपक्रम सुरू केलाय. महाराष्ट्रात विदर्भ, मराठवाडा, खानदेश, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र आपापल्या प्रांतानुसार लोकगीते विपुल प्रमाणात (Folk song competition for Democracys Awareness) आढळतात.

मतदारांनी आपला हक्क बजावला पाहिजे, आणि त्यासाठी कुठल्याही आमिषाला बळी न पडता संविधानिक मतदानाचे काम चोख बजावले पाहिजे. आपल्याला मिळालेल्या अधिकारामुळेच लोकप्रतिनिधींवर दबाव कसा निर्माण होईल ? खऱ्या अर्थाने लोकांची, लोकशाही कशी समृद्ध होईल ? त्यासाठी निवडणूक आयोगाने ही महाराष्ट्र स्तरावर स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे. स्पर्धेमध्ये एकल म्हणजे सोलो आणि समूह म्हणजे ग्रुप दोन्ही प्रकारचे लोकगीत महाराष्ट्रातील जनतेला सहभागी होता येईल, आणि लोकगीत पाठवता येतील.

अर्ज असा करावा -समूहगीत पाठवताना अर्ज एकाच स्पर्धकाच्या नावे भरायला हवा. स्पर्धेसाठी लोकशाही निवडणूक मताधिकार आधार जोडणे, या विषयावर लोकगीत गाऊन प्राची ध्वनिचित्रवीत अर्थात व्हिडिओ पाठवावा. त्यासोबत नृत्य केले असेल तरी चालेल. एका स्पर्धकाने किंवा एका समूहाने एकच गीत पाठवावे. आपल्या गीताची ध्वनिचित्र फीत पाठवताना तिची वेळेची मर्यादा आहे. कमीत कमी दोन मिनिटे जास्त पाच मिनिटे. ध्वनी चित्रफितीची म्हणजे व्हिडिओची साईज जास्तच जास्त 500 एमबी असावी. आणि ती mp4 फॉरमॅटमध्ये (Folk Songs Competition) असावी.

ध्वनीचित्रफीत व्हिडिओ गुगलवर अर्ज करताना जोडते वेळी, त्या व्यक्तीचे किंवा मंडळाचे नाव त्याचा लोगो येणार नाही याची काळजी घ्यावी. अन्यथा अर्ज स्पर्धेतून बाद केला जाईल. लोकशाही व निवडणूक आणि मताधिकार आधार जोडणे, या विषयांवर लोकगीत पाठवणाऱ्या स्पर्धकांचा अर्ज ग्राह्य धरला जाईल. अर्ज आणि ध्वनी चित्रफित पाठवण्यासाठी खालील गुगल अर्जावर माहिती भरून पाठवावी. https://forms.gle/hRoUEKUEb6bT2x4g9 यासाठी निवडणूक आयोगाकडे दोन्ही चित्रफीत पाठवताना अडचण आली, तर त्यांनी (8669058325 -प्रवीण सलगकर, 9987975553- तुषार पवार) प्रतिनिधींकडे व्हाटसपवर संपर्क साधावा.

स्पर्धेचे बक्षिसं - ही स्पर्धा 26 ऑक्टोबर नुकतीच सुरू करण्यात आली असून 31 ऑक्टोबर 2022 पर्यंत असेल. 31 ऑक्टोबरनंतर आलेले कुठलेही साहित्य स्पर्धेसाठी ग्राह्य धरले जाणार नाही. लोकगीत बोली भाषेमध्ये असेल तरी चालेल गुगलवर अर्ज करताना त्याचा मराठीत अनुवाद करून पाठवावा. या स्पर्धेसाठी बक्षीस पुढील प्रमाणे समूह लोकगीत पहिला क्रमांक 21,000 दुसरा क्रमांक 11,000 तिसरा क्रमांक पाच हजार उत्तेजनार्थ 1,000 एकल लोकगीत पहिला क्रमांक सात हजार, दुसरा क्रमांक 5,000 तिसरा क्रमांक 3,000 रुपये उत्तेजनार्थ पाचशे रुपयाची एकूण दहा बक्षिसे असतील. या स्पर्धेमध्ये मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय महाराष्ट्र यांच्यातर्फे प्रमाणपत्र देण्यात येईल. समूहामध्ये जास्तीत जास्त पंधरा व्यक्तींचा समावेश असावा. त्यापेक्षा अधिक व्यक्तींचा समावेश असला, तर त्यांना प्रमाणपत्र दिले जाणार (Democracy Awareness Election Commission) नाही.

नियमावली - विजेत्यांना बक्षिसाची रक्कम प्रमाणपत्र आणि मानचिन्ह निवडणूक आयोगाकडे देण्यात येईल. आलेल्या लोकगीतांमधून सर्वोत्तम गीते निवडण्याचा तसेच स्पर्धेच्या नियमांमध्ये बदल करण्याचा अंतिम निर्णय परीक्षक आणि आयोजक यांच्याकडे राहील. स्पर्धकाने पाठवलेल्या साहित्यावर अन्य कोणी स्वामित्व हक्क सांगितल्यास त्याची पडताळणी करण्याची जबाबदारी सदर स्पर्धकाची असेल. स्पर्धेतील उत्कृष्ट साहित्य मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या समाज माध्यमांवर प्रसारित केले जाईल, निवडणूक कार्यालयात कार्यरत कर्मचारी अधिकारी सदर स्पर्धेत सहभाग घेऊ शकतात. मात्र त्यांच्या साहित्याचा बक्षेसाठी विचार केला जाणार नाही. अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे महाराष्ट्र यांनी (Election Commission) दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.