मुंबई - भाजप सोबत युती करण्यासाठी ठाम असलेल्या बंडखोर एकनाथ शिंदे गटाने ( Eknath Shinde group spokesperson ) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेला ( Eknath Shinde challenge Shiv Sena ) आव्हान दिले आहे. यापूर्वी गटनेता ( Eknath Shinde group meeting ) आणि प्रवक्ते पद शिंदे गटाने नेम ले होते. आता प्रवक्त्यांची नेमणूक ( Eknath Shinde news ) करण्याचा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा - सध्याच्या राजकीय घडामोडीत फडणवीस यांचा सागर बंगला बनला सत्तास्थापनेचा केंद्रबिंदू
महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांनी सुरतमध्ये जाऊन बंड पुकारला. ३५ हून अधिक आमदारांनी शिंदे यांना पाठिंबा दिला. सर्व बंडखोर आसाममधील गुवाहाटी येथील हॉटेल रेडिसन ब्ल्यूमध्ये आहेत. येथूनच शिवसेनेला आव्हान दिले जात आहे.
शिवसेना विरोधात कार्यवाही करणाऱ्या बंडखोर आमदारांना शिवसेना विधिमंडळ प्रतोद सुनील प्रभू यांनी व्हीप बजावले. तसेच, गटनेते पदावरून एकनाथ शिंदे यांची उचलबांगडी करत अजय चौधरी यांची नेमणूक केली. मात्र, एकनाथ शिंदे यांनी संख्याबळ आमच्याकडे असल्याचे सांगत शिवसेनेच्या आदेशाला केराची टोपली दाखवली. तसेच, गटनेते पदी एकनाथ शिंदे, तर प्रतोदपदी भरत गोगावले यांची निवड केली. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना तसा पत्रव्यवहार केला. मात्र, विधिमंडळाने शिंदे गटाचे सर्व प्रस्ताव फेटाळून लावले. त्यामुळे, शिंदे गटाने आता कायदेशीर लढाई निर्णयाचे निर्णय घेतला आहे.
शिंदे गटाच्या एकनाथ शिंदे यांच्या सहित १६ बंडखोरांवर कारवाईच्या हालचाली सेनेने सुरू केल्या. शिंदे गटाने आव्हान दिले असून, आता प्रवक्ते नेमण्याचा निर्णय घेतला आहे. हे प्रवक्ते अधिकृतपणे शिंदे गटाची बाजू मांडणार असल्याचे समजते.
हेही वाचा - Maharashtra Political Crisis : शिवसेना राष्ट्रीय कार्यकारिणीची आज बैठक, बंडखोरांबाबत घेणार मोठा निर्णय