ETV Bharat / city

Eknath Shinde Tweet : दाऊदशी थेट संबंध असणाऱ्यांना बाळासाहेबांच्या शिवसेनेचं समर्थन कसं? - बाळासाहेबांच्या शिवसेनेचं समर्थन कसं

एकनाथ शिंदे यांनी एक ( Eknath Shinde tweeted ) नवा ट्वीट करत शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांना एक सवाल केला आहे. मुंबई बाँबस्फोट घडवून निष्पाप मुंबईकरांचा जीव घेणाऱ्या दाऊदशी थेट संबंध असणाऱ्यांना हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना समर्थन कशी करू शकते? असा सवाल शिंदे यांनी केला आहे.

Eknath Shinde
Eknath Shinde
author img

By

Published : Jun 26, 2022, 10:40 PM IST

Updated : Jun 26, 2022, 10:52 PM IST

मुंबई - एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांच्या बंडखोरीनंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. दोन्ही बाजूंनी आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांच्याकडून शिंदे आणि बंडखोर आमदारांवर जोरदार टीका सुरु आहे. अशात आता एकनाथ शिंदे यांनी एक नवा ट्वीट करत शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांना एक सवाल केला आहे. मुंबई बाँबस्फोट घडवून निष्पाप मुंबईकरांचा जीव घेणाऱ्या दाऊदशी थेट संबंध असणाऱ्यांना हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना समर्थन कशी करू शकते? असा सवाल शिंदे यांनी केला आहे. शिवाय यालाच विरोध म्हणून उचललेले हे पाऊल, आम्हा सर्वांना मृत्यूच्या दारात घेऊन गेले तरी बेहत्तर, असेही शिंदे यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.

  • मुंबई बाँबस्फोट घडवून निष्पाप मुंबईकरांचा जीव घेणाऱ्या दाऊदशी थेट संबंध असणाऱ्यांना हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना समर्थन कशी करू शकते…?
    यालाच विरोध म्हणून उचललेलं हे पाऊल; आम्हा सर्वांना मृत्यूच्या दारात घेऊन गेले तरी बेहत्तर..#MiShivsainik @rautsanjay61

    — Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 26, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

काय म्हटले आहे ट्वीटमध्ये ? : एकनाथ शिंदे ट्वीट करत म्हणाले, मुंबई बाँबस्फोट घडवून निष्पाप मुंबईकरांचा जीव घेणाऱ्या दाऊदशी थेट संबंध असणाऱ्यांना हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना समर्थन कशी करू शकते? यालाच विरोध म्हणून उचललेले हे पाऊल. आम्हा सर्वांना मृत्यूच्या दारात घेऊन गेले तरी बेहत्तर. हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचारांसाठी आणि बाळासाहेबांची शिवसेना वाचविण्यासाठी आम्हाला मरण जरी आले तरी बेहत्तर. तसे झाल्यास आम्ही सारे आमचं भाग्य समजू, अशा आशयाचे ट्वीट एकनाथ शिंदे यांनी केले आहे.

  • हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचारांसाठी आणि बाळासाहेबांची शिवसेना वाचविण्यासाठी आम्हाला मरण जरी आलं तरी बेहत्तर....
    तसे झाल्यास आम्ही सारे आमचं भाग्य समजू...#MiShivsainik @rautsanjay61

काय म्हणाले होते संजय राऊत? : दहिसर येथील शिवसेनेच्या मेळाव्यात मार्गदर्शन करताना संजय राऊत म्हणाले होते की, 40 आमदारांचे मृतदेह थेट गुवाहाटीमधून येतील. त्यांना थेट शवागृहात पोस्टमोर्टमसाठी पाठवू. गुवाहाटीमध्ये एक मंदिर आहे. या मंदिरात रेड्याचा बळी दिला जातो. आम्ही 40 रेडे पाठवले आहेत, राऊत यांनी केलेल्या याच वादग्रस्त वक्तव्यावर एकनाथ शिंदे यांनी हे ट्वीट केले आहे.

हेही वाचा - Maharashtra Political Crisis : शिवसेनेच्या बंडखोर गटाची 'या' कारणासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव

Last Updated : Jun 26, 2022, 10:52 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.