ETV Bharat / city

Eknath Shinde talk to CM : एकथाथ शिंदे मुख्यमंत्र्यांना थेटच म्हणाले, तुमचं तुम्ही ठरवा, माझं मी ठरवतो - Eknath Shinde talks with CM thackeray

शिवसेनेला खिंडार पाडणाऱ्या एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांनी मुख्यमंत्र्यांशी फोनवर झालेल्या संवादात थेट म्हटलंय की, तुमचं तुम्ही बघा, माझं मी पहातो. शिंदेंच्या या वक्तव्याने शिवसेनेतील असंतोष कमालीचा वाढला असल्याचंच स्पष्ट होतं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray ) यांचे दूत म्हणून सूरतला गेलेल्या मिलिंद नार्वेकर यांनी शिंदे यांचे ठाकरेंशी फोनवरून बोलणे करून दिले. त्यावेळी शिंदे यांनी आक्रमक भूमिका घेतल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

Eknath Shinde
Eknath Shinde
author img

By

Published : Jun 21, 2022, 8:06 PM IST

मुंबई - शिवसेनेला खिंडार पाडणाऱ्या एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांनी मुख्यमंत्र्यांशी फोनवर झालेल्या संवादात थेट म्हटलंय की, तुमचं तुम्ही बघा, माझं मी पहातो. शिंदेंच्या या वक्तव्याने शिवसेनेतील असंतोष कमालीचा वाढला असल्याचंच स्पष्ट होतं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray ) यांचे दूत म्हणून सूरतला गेलेल्या मिलिंद नार्वेकर यांनी शिंदे यांचे ठाकरेंशी फोनवरून बोलणे करून दिले. त्यावेळी शिंदे यांनी आक्रमक भूमिका घेतल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

विधान परिषदेच्या निकालानंतर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी रातोरात गुजरातचा रस्ता धरला. तिथे ते भाजपच्या शिर्षस्थ नेत्यांच्या संपर्कात असल्याचे कळते. शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली. एकनाथ शिंदे यांची समजूत काढण्यासाठी शिवसेनेकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे दूत म्हणून मिलिंद नार्वेकर आणि रविंद्र फाटक घाईघाईने सूरतला पोहोचले.

फोनवरून मुख्यमंत्र्यांशी संवाद - मिलिंद नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे यांच्याशी प्रथम चर्चा केली. त्यानंतर आपल्याच फोनवरून उद्धव ठाकरे यांना फोन लावत एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्र्यांचा संवाद करून दिला. यावेळी एकनाथ शिंदे यांनी एकनाथ शिंदे बरेच संतापले होते असे सुत्रांचे म्हणणे आहे. शिंदे यावेळी मुख्यमंत्र्यांना म्हणाले की, एकीककडे मला गटनेतापदावरून काढल, का? आमदारांच्या अपहरणाचा आरोपही केला, त्याचवेळी चर्चाही करत आहात, असं का?

संजय राऊतांच्या वागण्यावर आक्षेप - एकनाथ शिंदे मुख्यमंत्र्यांना म्हणाले, संजय राऊत माझ्यासोबत बोलताना, फोनवर बोलताना खूप चांगले बोलतात. मग माध्यमांसमोर मात्र माझ्याविरोधात कसं काय बोलू शकतात. संजय राऊत यांच्या वागण्याबोलण्यावर शिंदे नाराज असल्याचे दिसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

भाजपशी युती व्हावी - हिंदुत्वाच्या मुद्याच्या आधारे शिवसेना आणि भाजपची युती व्हायला हवी, अशी स्पष्ट भूमिका एकनाथ शिंदे यांनी दूरध्वनीवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मांडली, असे सुत्रांनी सांगितले. दोन्ही नेत्यांचा फोनवरील संवाद संपल्यानंतर मिलिंद नार्वेकर आणि रविंद्र फाटक लगोलग मुंबईकडे रवाना झाले.

हेही वाचा - सेना आमदार पती बेपत्ता असल्याची पत्नीची पोलिस ठाण्यात तक्रार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.