ETV Bharat / city

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आता मिशन लोकसभा? - Shinde faction group

शिंदे गटात ( Shinde faction group ) सहभागी होणाऱ्या खासदारांच्या वेगळ्या गटाला मान्यता दिली जावी अशी विनंती करणारे पत्र आज लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना देण्यात येणार आहे. लोकसभेचे कामकाज सुरू होण्यापूर्वी मंगळवारी सकाळी शिंदे गटातील खासदारांचे शिष्टमंडल बिर्ला यांची भेट घेऊन त्यांना हे पत्र देणार असल्याची माहिती समोर आली आहे. ज्या पद्धतीने राज्यात विधानसभा अध्यक्षांना पत्र देऊन शिवसेनेने आपल्या पद्धतीने गटनेते व प्रतोद पदाची नेमणूक केली त्याच पद्धतीने आता लोकसभेतही ही मागणी केली जाणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
author img

By

Published : Jul 19, 2022, 9:02 AM IST

मुंबई - राज्यातील ४० आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( 40 MLAs join shinde group ) यांच्या गटामध्ये सामील झाल्यानंतर आता संसदेमध्येही स्वतंत्र गट तयार करण्याच्या तयारीत एकनाथ शिंदे आहेत. शिवसेनेच्या १२ खासदारांचा पाठिंबा असल्याचा शिंदे गटाचा दावा आहे. आज यासंदर्भामध्ये ते लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची ( Lok Sabha Speaker Om Birla ) भेट घेऊन त्यांना त्या पद्धतीचे पत्र देणार असल्याची माहिती समोर आली आहे. एकंदरीत आता राज्यापाठोपाठ संसदेतही एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला दे धक्का देण्याच्या तयारीत आहेत.

शिवसेना खासदार बंडाच्या पवित्र्यात? शिवसेनेतून बंडखोरी करत ४० आमदारांच्या पाठबळावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात सत्ता स्थापन केल्यानंतर आता खासदारांचाही त्यांना पाठबल भेटताना दिसत आहे. मुख्यमंत्रीपद मिळवल्यानंतर शिंदे ( Uddhav Thackerays Shiv Sena ) यांनी पक्ष संघटनेत फूट पाडण्यासाठी पक्ष पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवक, माजी आमदार यांना आपल्याकडे वळवण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. त्यातच राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत शिवसेना खासदारांमध्ये ही फूट पडल्याची दिसून आली. एनडीएच्या उमेदवार द्रोपदी मुर्मू ( NDA candidate Draupadi Murmu ) यांना पाठिंबा देण्यासाठी शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी पुढाकार घेत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना त्या पद्धतीचं पत्र दिले होते. त्यानंतर खासदारांमध्ये फूट पडता कामा नये म्हणून उद्धव ठाकरे यांनी सुद्धा ती मागणी मान्य करत भाजपच्या उमेदवार द्रोपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केला. तरी सुद्धा आता राष्ट्रपती निवडणुकीनंतर शिवसेनेचे खासदार बंडाच्या पवित्र्यात आहेत.

आज लोकसभा अध्यक्षांना देणार पत्र? शिंदे गटात सहभागी होणाऱ्या खासदारांच्या वेगळ्या गटाला मान्यता दिली जावी अशी विनंती करणारे पत्र आज लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना देण्यात येणार आहे. लोकसभेचे कामकाज सुरू होण्यापूर्वी मंगळवारी सकाळी शिंदे गटातील खासदारांचे शिष्टमंडल बिर्ला यांची भेट घेऊन त्यांना हे पत्र देणार असल्याची माहिती समोर आली आहे. ज्या पद्धतीने राज्यात विधानसभा अध्यक्षांना पत्र देऊन शिवसेनेने आपल्या पद्धतीने गटनेते व प्रतोद पदाची नेमणूक केली त्याच पद्धतीने आता लोकसभेतही ही मागणी केली जाणार आहे. राष्ट्रपतीपदाच्या मतदानानंतर शिंदे गटाची ऑनलाईन बैठक पार पडली. या बैठकीला शिवसेनेच्या १२ खासदारांनी हजेरी लावल्याचे समजते. बैठकीत जवळपास अर्धातास चर्चा झाली. गटनेते पदासाठी राहुल शेवाळे आणि मुख्य प्रतोद पदासाठी भावना गवळी यांच्या नावाची चर्चाही झाल्याचे समजते. या सर्व घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोमवारीच दिल्लीला रवाना झाले. आज ते पंतप्रधान नरेंद्र मोदी त्याचबरोबर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचीही भेट घेणार असून जर त्यांनी हिरवा कंदील दिल्यास आजच लोकसभेत या संदर्भातील पत्र देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

शिंदे गटासोबत असलेले खासदार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे, राहुल शेवाले, हेमंत पाटील, प्रतापराव जाधव, कृपाल तुमाणे, भावना गवळी, श्रीरंग बारणे, संजय मंडळीक, धैर्यशील माने, सदाशिव लोखंडे, हेमंत गोडसे, राजेंद्र गावित हे खासदार शिंदे गटासोबत जाणार असल्याची ही माहिती आहे.

शिंदे गटाची नवी कार्यकारिणी -उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटाकडून दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर उद्या २० जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या घटनापिठासमोर सुनावणी होण्याआधीच एकनाथ शिंदे गटाकडून मोठी खेळी खेळण्यात आली आहे. एकनाथ शिंदे गटाने शिवसेनेची नवी राष्ट्रीय कार्यकारणी जाहीर केली असून मुख्य नेता म्हणून एकनाथ शिंदे यांची तर मुख्य प्रवक्ते म्हणून दीपक केसरकर यांची नेमणूक करण्यात आली आहे. या कार्यकरणीत पक्षप्रमुख पदाची नेमणूक टाळताना इतर पदांवरील नेत्यांची ही नेमणूक करण्यात आली असून हा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.