अजित पवार, जितेंद्र आव्हाड हे एकनाथ खडसे यांच्या पक्षप्रवेशामुळे नाराज असल्याच्या चर्चा आहेत. मात्र, कोणीही नाराज नाही. अजित पवार देखील नाराज नसल्याचे शरद पवार यांनी सांगितले.
खडसेंचा राष्ट्रवादीत प्रवेश; मंत्रिमंडळात कोणताही बदल होणार नाही - शरद पवार
16:33 October 23
अजित पवार नाराज नाहीत - शरद पवार
16:29 October 23
नाथाभाऊंमुळे संघटनेची शक्ती वाढेल - शरद पवार
आजचा दिवस आनंदाचा आहे. नाथाभाऊंमुळे खान्देशात राष्ट्रवादीची ताकद वाढेल असा विश्वास राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला. अजित पवार नाराज नसल्याचेही शरद पवार यांनी यावेळी सांगितले.
16:19 October 23
काही दिवस जाऊद्या कोणी किती भूखंड घेतले हे मी सांगतो - खडसे
भाजपमध्ये माझ्यावर अन्याय झाला असून, कारण नसतानाही माझ्या मागे अनेक चौकशा लावल्या. संबंध नसतानाही मला अडचणील आणायचे काम भाजपने केले आहे. येत्या काही दिवसात कोणी किती भूखंड घेतले हे मी सांगतो, असे म्हणत एकनाथ खडसे यांनी भाजपवर जोरदार टीका केली.
16:13 October 23
दुप्पट वेगाने मी राष्ट्रवादी वाढवेन - एकनाथ खडसे
नाथाभाऊची ताकद काय आहे हे दाखवून देतो. भाजपपेक्षा राष्ट्रवादी दुप्पट वाढवण्यासाठी मी निष्ठेने काम करणार असल्याचे एकनाथ खडसे यांनी सांगितले. आज माझ्या डोक्यावरचे ओझे हालके झाले असल्याचे खडसे म्हणाले. काल रात्री मला दिल्लीवरून फोन आले, पण मी निर्णय घेतला असल्याचे खडसे यांनी सांगितले.
16:09 October 23
मी पाठीमागून खंजीर कधीच खुपसला नाही- खडसे
मी पाठीमागून खंजीर कधीच खुपसला नाही. तसेच महिलेला समोर ठेऊन कधी राजकारण केले नाही, असे म्हणत एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाव न घेता टीका केली.
16:07 October 23
राष्ट्रवादीत प्रवेश दिल्याबद्दल शरद पवारांचे आभार - खडसे
राष्ट्रवादीत प्रवेश दिल्यामुळे शरद पवार यांचे आभार मानतो. ऐकाऐकी भाजप सोडेल असे कधी वाटले नाही. माझी भाजपमध्ये छळवणूक झाली. मी खूप संघर्ष केला असून, तो मंत्रिमंडळामध्ये देखील केला असल्याचे एकनाथ खडसे म्हणाले.
15:58 October 23
कानामागून आला आणि तिखट झाला; जयंत पाटलांचा फडणवीसांना चिमटा
कानामागून आला आणि तिखट झाला, अशी गत सध्या भाजपमध्ये झाली आहे. त्यामुळे नाथाभाऊंवर भाजपमध्ये अन्याय झाला आहे, असे म्हणत जयंत पाटलांनी फडणवीसांना चिमटा काढला आहे.
15:57 October 23
गटबाजीची भावना राष्ट्रवादीत नाही - प्रदेशाध्यक्ष
राष्ट्रवादीत कोणतीही गटबाजीत होत नाही. राज्यात राष्ट्रवादीची ताकद ही फक्त शरद पवार यांच्या स्वाभावामुळे आणि नेतृत्वामुळे वाढली आहे. शेतकऱयांना काही अडचणी असल्या तरी ते फक्त शरद पवारांकडेच आपली कैफियत मांडत असल्याचे जयंत पाटील म्हणाले.
15:52 October 23
एकनाथ खडसेंवर भाजपने अन्याय केला - जयंत पाटील
एकनाथ खडसे हे भाजपचे कणखर नेते होते. मात्र, भाजपच्या काही नेत्यांनी खडसेंना जाणीवपूर्वक खाली बसवण्याचे काम भाजपने केले असल्याचे जयंत पाटील म्हणाले.
15:46 October 23
खडसेंना जाणीवपूर्वक सभागृहातील मागच्या रांगेत बसवण्याचे काम भाजपने केले - जयंत पाटील
खडसेंना जाणीवपूर्वक सभागृहातील मागच्या रांगेत बसवण्याचे काम भाजपने केले आहे असल्याचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले.
15:32 October 23
शरद पवार राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात पोहचले
शरद पवार राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात पोहचले आहेत. याठिकाणी राष्ट्रवादीचे अनेक मंत्री, आमदार आणि खासदार यांची उपस्थिती आहे. थोड्याच वेळात एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश होणार आहे. याठिकाणी राष्ट्रवादीचे अनेक कार्यकर्ते यांनी उपस्थिती लावली आहे.
15:25 October 23
शरद पवार-जितेंद्र आव्हाड यांच्यातली बैठक संपली
शरद पवार- जितेंद्र आव्हाड यांच्यातली बैठक संपली आहे. यानंतर पवार आणि आव्हाड एकाच गाडीतून राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयाकडे रवाना झाले आहेत. या बैठकीत काय चर्चा झाली याची माहिती मिळू शकली नाही.
15:17 October 23
अर्धा तासापासून खडसे राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात, पक्ष प्रवेशासाठी उशीर
एक तासाभरापासून शरद पवार आणि आव्हाड यांची बैठक सुरू आहे. त्यामुळे अर्ध्या तासापासून एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात उपस्थित आहेत. मात्र, पवार-आव्हाड यांची बैठक सुरू असल्याने हा प्रवेश लांबणीवर पडला आहे.
15:11 October 23
शरद पवार आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात बैठक सुरू
शरद पवार आणि जितेंद्र आव्हाड यांच्या महत्वाची बैठक सध्या सुरू आहे. मंत्री पदावरून आव्हाड यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न राष्ट्रवादीकडून सुरू असल्याची चर्चा आहे.
14:57 October 23
एकनाथ खडसे राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात पोहचले
एकनाथ खडसे हे मुंबईतील राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात पोहचले आहेत. याठिकाणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली आहे. याठिकाणी खडसे समर्थकही मोठ्या संख्येने हजर आहेत.
14:39 October 23
खडसेंचा थोड्याच वेळात राष्ट्रवादीत प्रवेश
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात एकनाथ खडसे यांचा पक्षप्रवेशाची तयारी पूर्ण झाली आहे. या ठिकाणी एकनाथ खडसे समर्थकांसह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची गर्दी होऊ लागली आहे. जळगाव धुळे, नंदुरबार या ठिकाणहून कार्यकर्ते या ठिकाणी दाखल झाले आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अगदी थोड्याच वेळात एकनाथ खडसे हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.