मुंबई - मुलुंड प्लास्टिकमुक्तीसाठी अथक प्रतिष्ठानकडून एक हाक मुलुंड प्लास्टिक मुक्तीची ही शोभायात्रा आज गुढीपाडव्यानिमित्त काढण्यात आली आहे. यात 'प्लास्टिक मुक्त भारत एक हाक मुलुंड प्लास्टिक मुक्त करण्याची' हा संदेश घेऊन आज नववर्षानिमित्त शोभायात्रेत अथक प्रतिष्ठानने मोठ्या संख्येने सहभाग घेतला आहे. या प्रतिष्ठानचे अतुल कस्तुरे यांनी 'मेरा भारत स्वच्छ भारत' ही घोषणा देत प्लास्टिक मुक्त मुलुंड हा संदेश दिला आहे.
महाराष्ट्र राज्यामध्ये प्लास्टिक बंदी आहे. पण जे प्लास्टिक बंद झाले ते फक्त वन टाईम वापरले जाणारे प्लास्टिक आहे. जे फक्त पाच ते सहा टक्के प्लास्टिक बाकी ९५ टक्के प्लास्टिक आपल्या घरात येत आहे. प्लास्टिक मुक्त मुलुंड ठेवण्यासाठी ही मुलुंडमध्ये मोहीम चालू आहे, असे अतुल कस्तुरे म्हणाले. मुलुंडमध्ये आमचा पायलट प्रोजेक्ट चालू आहे. जेणेकरुन आम्ही महिन्याच्या शेवटच्या रविवारी प्लास्टिक गोळा करुन प्लास्टिक पुण्याला पाठवतो. त्यानंतर प्लास्टिकचे रुपांतर हायस्पीड डिझेलमध्ये करण्यात येते. म्हणजे त्याला इंसोल्युशन देण्यात येत आहे. हे प्लास्टिक निसर्गात परत जाणार नाही. त्याचे डिझेलमध्ये रुपांतर होईल.
मुलुंडमध्ये जवळपास शंभर सोसायट्या आणि सर्वच शाळा यांचा सहभाग असतो. आम्ही गेले २६ महिने हा कार्यक्रम चालू केला आहे. त्यात सध्या लोकल कॉर्पोरेटर आणि सगळ्याच पक्षांचा सहभाग आहे. प्लास्टिक प्रदूषण ही खूप मोठी समस्या आहे. त्याच्यासाठी आम्ही सगळे एकत्र होऊन गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर शोभायात्रामध्ये आम्ही सहभाग घेतलेल्याचे त्यांनी सांगितले.
गुडीपाडव्यानिमित्त निघालेल्या भव्य शोभायात्रेत मतदानाचा टक्का वाढवावा यासाठी सर्वांनी मतदान केले पाहिजे. पुढील काळात चांगले प्रशासन निर्माण झाले पाहिजे. लोकशाहीच्या हितासाठी आपण सर्वांनी आवश्य मतदान केले पाहिजे, असे अथक प्रतिष्ठानचे अतुल कस्तुरे यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले.