मुंबई - मागील 24 तासांत राज्यात कोरोनामुळे 8 पोलिसांचा मृत्यू झाला असून तब्बल 311 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आता पर्यंत राज्य पोलीस खात्यात तब्बल 202 पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून यात 20 पोलीस अधिकारी तर 182 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
राज्यात आता पर्यंत 19 हजार 756 पोलीस कोरोनाबाधित झाले असून यात 2 हजार 142 पोलीस अधिकारी व 17 हजार 614 पोलीस कर्मचारी आहेत. 3 हजार 724 पोलीस हे राज्यातील वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार घेत असून यात 460 पोलीस अधिकारी 3 हजार 264 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. आता पर्यंत 15 हजार 830 पोलीस संक्रमणातून पूर्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आलाय. यात एक हजार 662 पोलीस अधिकाऱ्यांसह 14 हजार 168 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
राज्य पोलिसांकडून कलम 188 नुसार तब्बल 2 लाख 54 हजार 929 गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलिसांवर हल्ला होण्याच्या 356 घटना घडल्या आहेत. या संदर्भात आता पर्यंत 894 आरोपींना अटक झाली आहे. पोलिसांवर झालेल्या हल्ल्यात आतापर्यंत 89 पोलीस जखमी झालेले असून वैद्यकीय पथकावर हल्ला होण्याच्या 74 घटना घडल्या आहेत.
चिंताजनक...गेल्या 24 तासांत 8 पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू, तर 311 'पॉझिटिव्ह' - महाराष्ट्र पोलीस कोरोना वृत्त
महामारीच्या काळात कर्तव्यावर तत्पर असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव होत आहे. महाराष्ट्रात पोलिसांमधील संक्रमण अधिक तीव्र होत असून गेल्या चोवीस तासांत आठ पोलिसांचा मृत्यू झाला आहे.