ETV Bharat / city

शिक्षण विभागाच्या चुकीमुळेच दहावीच्या विद्यार्थ्यांना कमी गुण, शिक्षण उत्कर्ष मंचचा आरोप - दहावी

शिक्षण उत्कर्ष मंचने २८ ऑक्टोबर २०१८ रोजी याविषयी शिक्षण मंडळाकडे मागणी करत दहावीचा अभ्यासक्रम आणि मुल्यमापन पद्धतीत यंदा बदल करण्यात येऊ नये, अशी मागणी केली होती. मात्र, त्याकडे मंडळाने दुर्लक्ष केल्यामुळे यावर्षी दहावीचा निकाल कमी लागला आहे.

दहावीचे विद्यार्थी आणि त्यांचे पालक
author img

By

Published : Jun 9, 2019, 10:23 AM IST

मुंबई - दहावीचा अभ्यासक्रम आणि मुल्यमापन पद्धतीत करण्यात आलेल्या बदलामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांना कमी गुण मिळतील. यामुळे शिक्षण विभागाने हा बदल करू नये, असा इशारा शिक्षण उत्कर्ष मंचने राज्य शिक्षण मंडळाला दिला होता. मात्र, त्याकडे मंडळाकडून दुर्लक्ष करण्यात आल्याने दहावीच्या परीक्षेचा निकाल तब्बल १२.३१ टक्क्यांनी घटल्याचे आज समोर आले. याविषयी राज्यभरात विद्यार्थी, पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

शिक्षण मंडळाच्या निर्णयाची माहिती देताना सुधीर घागस आणि जालिंदर सरोदे

शिक्षण उत्कर्ष मंचने २८ ऑक्टोबर २०१८ रोजी याविषयी शिक्षण मंडळाकडे मागणी करत दहावीचा अभ्यासक्रम आणि मुल्यमापन पद्धतीत यंदा बदल करण्यात येऊ नये, अशी मागणी केली होती. 'ईटीव्ही भारत'मध्ये 'दहावीच्या परीक्षेतील गुणांचे 'गणित' बिघडणार" या मथळ्याखाली २८ ऑक्टोबरला बातमी प्रसिध्द करण्यात आली होती. त्यानंतर विविध विद्यार्थी संघटना, शिक्षक भारती आणि इतर संघटनांनी याविषयी शालेय शिक्षण आणि सरकारकडे मागणी केली होती, मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने दहावीच्या निकालात मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे अकरावीच्या प्रवेशाला मुख्य शहरात राज्यातील विद्यार्थ्यांपुढे इतर मंडळातील विद्यार्थ्यांच्या अडचणी उभ्या टाकणार आहेत. यामुळे सरकारने आमचे ऐकले असते तर हा प्रसंग उद्भवला नसता, अशी प्रतिक्रिया शिक्षण उत्कर्ष मंचाचे प्रमुख सुधीर घागस यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.

दहावीच्या घटलेल्या निकालामुळे राज्य शिक्षण मंडळातील विद्यार्थी हे इतर मंडळाच्या तुलनेत मागे पडतील, अशी भीती शिक्षक भारतीचे कार्यवाह जालिंदर सरोदे यांनी व्यक्त केली. तर युवा सेनेच्या साईनाथ दुर्गे यांनी शिक्षण विभागाच्या कारभारवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत निषेध व्यक्त केला आहे.

कशामुळे झाले गुण कमी?

या परीक्षेत पूर्व ज्ञानावर आधारीत म्हणजेच गणित, विज्ञान आणि इंग्रजी विषयासाठी नववीतील अभ्यासक्रमावर आधारीत २० गुणांचे प्रश्न विचारले होते. नववीतील अभ्यासक्रमावर आधारित असेलल्या प्रश्नांमध्ये गणितांच्या भाग-१ आणि भाग-२ अशी दोन पुस्तके आणि त्यासाठी १०० गुणांची प्रश्नपत्रिका होती. यात दोन्ही पेपरची लेखी परीक्षा ही प्रत्येकी ४० प्रमाणे ८० गुणांची आणि त्यात २० गुण हे अंतर्गत मुल्यमापनाचे म्हणजेच नववीच्या आशयावर आधारीत होते. भाग एक आणि भाग दोन मिळून घेतलेल्या चाचणी परीक्षेतील रुपांतरीत गुण हे १०, भाग एक वरील प्रात्यक्षिकासाठी प्रत्येकी ५ प्रमाणे एकूण २० असे अंतर्गत मुल्यमापनाचे गुण होते.

Intro:शिक्षण उत्कर्ष मंचने दहावीत गुण कमी होण्याचा दिला होता पूर्व इशारा; शिक्षण विभागाने केले दुर्लक्Body:
शिक्षण उत्कर्ष मंचने दहावीत गुण कमी होण्याचा दिला होता पूर्व इशारा; शिक्षण विभागाने केले दुर्लक्ष

(सोबत सुरुवातीला शिक्षण उत्कर्ष मंचचे सुधीर घागस आणि त्यानंतर शिक्षक भारतीचे जालिंदर सरोदे यांचा बाईट जोडत आहे)

मुंबई, ता. 8 :

दहावीच्या अभ्यासक्रम व मुल्यमापन पद्धतीत करण्यात आलेल्या बदलामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांना कमी गुण मिळतील, यामुळे हा बदल शिक्षण विभागाने यंदाच्या शैक्षणिक वर्षात करू नये, असा इशारा शिक्षण उत्कर्ष मंचने सर्वात अगोदर राज्य शिक्षण मंडळाला दिला होता. मात्र त्याकडे मंडळाकडून दुर्लक्ष करण्यात आल्याने दहावीच्या परीक्षेचा निकाल तब्बल 12.31 टक्क्यांनी घटल्याचे आज समोर आले असून याविषयी राज्यभरात विद्यार्थी, पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
शिक्षण उत्कर्ष मंचने 28 आक्टोबर 2018 रोजी याविषयी शिक्षण मंडळाकडे मागणी करत दहावीच्या अभ्यासक्रम व मुल्यमापन पद्धतीत यंदा बदल करण्यात येऊ नये अशी मागणी केली होती. 'ईटीव्ही भारत' मध्ये 'दहावीच्या परीक्षेतील गुणांचे 'गणित' बिघडणार" या मथळ्याखाली 28 ऑक्टोबर रोजी बातमी प्रसिध्द करण्यात आली होती.त्यानंतर विविध विद्यार्थी संघटना, शिक्षक भारती आदी संघटनांनी याविषयी शालेय शिक्षण आणि सरकारकडे मागणी केली होती, मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने दहावीच्या निकालात मोठी घसरण झाली असून त्यामुळे अकरावीच्या प्रवेशाला मुख्य शहरात राज्यातील विद्यार्थ्यांपुढे इतर मंडळातील विद्यार्थ्यांच्या अडचणी उभ्या टाकणार आहेत. यामुळे सरकारने आमचे ऐकले असते तर हा प्रसंग उद्भवला नसता अशी प्रतिक्रिया शिक्षण उत्कर्ष मंचाचे प्रमुख सुधीर घागस यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.
दहावीच्या घटलेल्या निकालामुळे राज्य शिक्षण मंडळातील विद्यार्थी हे इतर मंडळाच्या तुलनेत मागे पडतील अशी भीती शिक्षक भारतीचे कार्यवाह जालिंदर सरोदे यांनी व्यक्त केली. तर युवा सेनेच्या साईनाथ दुर्गे यांनी शिक्षण विभागाच्या कारभारवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत निषेध व्यक्त केला आहे.
--

कशामुळे झाले गुण कमी?

- या परीक्षेत पूर्व ज्ञानावर आधारीत म्हणजेच गणित, विज्ञान आणि इंग्रजी विषयासाठी नववीतील अभ्यासक्रमावर आधारीत २० गुणांचे प्रश्न नववीच्या लेखी परीक्षेतील विचारले होते.
- नववीतील अभ्यासक्रमावर आधारित असेलल्या प्रश्नांमध्ये गणितांच्या भाग-१, व भाग-२  अशी दोन पुस्तके आणि त्यासाठी १०० गुणांची प्रश्नपत्रिका होती.

- यात दोन्ही पेपरची लेखी परीक्षा ही  प्रत्येकी ४० प्रमाणे ८० गुणांची आणि त्यात २० गुण हे अंतर्गत मुल्यमापनाचे म्हणजेच नववीच्या आशयावर आधारीत होते.

-भाग एक आणि भाग दोन मिळून घेतलेल्या चाचणी परीक्षेतील रुपांतरीत गुण हे १०, भाग एक वरील प्रात्यक्षिकासाठी प्रत्येकी पाच प्रमाणे एकुण २० असे अंतर्गत मुल्यमापनाचे गुण होते

Conclusion:शिक्षण उत्कर्ष मंचने दहावीत गुण कमी होण्याचा दिला होता पूर्व इशारा; शिक्षण विभागाने केले दुर्लक्
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.