ETV Bharat / city

शिक्षण विभागाचा यूटर्न? कोरोनामुक्त गावात शाळा सुरू करण्याबाबतचा शासन निर्णय मागे - शासन निर्णय मागे

शालेय शिक्षण विभागाने राज्यातील कोरोनामुक्त भागातील इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग सुरु करण्याबाबत निर्णय सोमवारी घेण्यात आला होता.

school
शाळा संग्रहित फोटो
author img

By

Published : Jul 6, 2021, 4:44 PM IST

मुंबई - महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण विभागाने राज्यातील कोरोनामुक्त भागातील इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग सुरु करण्याबाबत निर्णय सोमवारी घेण्यात आला होता. मात्र, अवघ्या काही तासात जाहीर केलेल्या शासन निर्णयात तांत्रिक त्रुटी असल्याचे कारण देत तो वेबसाईटवरून हटवण्यांत आला आहे. त्यामुळे शालेय शिक्षण विभागाच्या कार्यपद्धतीवर मोठ्या प्रमाणात प्रश्नचिन्ह उपस्थितीत होत आहे.

  • तांत्रिक त्रुटींमुळे हटवला शासन आदेश -

शालेय शिक्षण विभागाने राज्यातील कोरोनामुक्त भागातील इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याबाबत ५ जुलै २०२१ रोजी निर्णय घेतला होता. महाराष्ट्र शासनाने याबाबत सोमवारी शासन निर्णयही जारी केला होता. कोरोनामुक्त क्षेत्रातील ग्रामपंचायती आणि स्थानिक स्वराज संस्थांच्या ठरावांनी शासन निर्णयात जारी करण्यात आलेल्या निकषांच्या आधारे पहिल्या टप्प्यात इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. शाळा सुरू कारण्याबाबद मार्गदर्शक सूचनासुद्धा जारी केल्या होत्या. मात्र, रात्री उशिरा शासनाच्या वेबसाईटवरून शाळा सुरू कारण्याबाबतचा शासन निर्णय हटवण्यात आलेला आहे.

  • लवकरच सुधारित शासन निर्णय -

शाळा सुरू करण्याआधी स्थानिक पातळीवरील अहवाल मागवण्यात येणार आहेत. तसेच ग्रामीण भागात कोरोनामुक्त गावातील ग्रामपंचायतीने त्यांच्या अखत्यारीत असणारे गावातील. शाळेतील इयत्ता आठवी ते इयत्ता बारावीचे वर्ग सुरू करणेबाबत पालकांशी चर्चा करून ठराव करावा. त्यानुसार शाळा सुरू करण्यात यावीत असे आदेश होते. याशिवाय शाळा सुरू करण्याबाबत मार्गदर्शक सूचनांमध्ये, शाळेतील शिक्षकांची राहण्याची व्यवस्था शक्यतो त्याच गावात करण्यात यावी किंवा त्यांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करू नयेत. अशा जाचक अटी असल्यामुळे शिक्षकांनी नाराजी व्यक्त केली होती. यामुळे हा शासन निर्णय मागे घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे या तांत्रिक त्रुटी दुरुस्ती करण्यात येणार आहेत. त्यानंतर शाळा सुरू करण्याबाबतचा शासन निर्णय जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.