ETV Bharat / city

राज्यातील नेत्यांवर ईडीचा 'वॉच' : अनेकांची कोट्यावधीची संपत्ती केली जप्त - विवेक पाटील

एकनाथ खडसेपासून ते अनिल देशमुखांपर्यंत अनेकजण ईडीच्या रडावर आहेत. काही प्रकरणात ईडीनं कारवाई देखील केली आहे. या कारवाईत ईडीनं या नेत्यांची करोडो रुपयांची संपत्ती देखील जप्त केली आहे. मनी लॉड्रींग प्रकरणात ही कारवाई केली आहे. मागच्या काही वर्षांपासून ईडीच्या रडावर असणारे एकनाथ खडसे, अनिल देशमुख, विवेक पाटील आणि उद्योजक अविनाश भोसले यांच्या कोटींच्या संपत्तीवर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे.

ईडी कार्यालय मुंबई
ईडी कार्यालय मुंबई
author img

By

Published : Aug 29, 2021, 7:13 AM IST

मुंबई - सक्त वसूली संचलनालय (ईडी) सध्या अॅक्शन मोडमध्ये दिसत आहे. एकनाथ खडसेपासून ते अनिल देशमुखांपर्यंत अनेकजण ईडीच्या रडावर आहेत. काही प्रकरणात ईडीनं कारवाई देखील केली आहे. या कारवाईत ईडीनं या नेत्यांची करोडो रुपयांची संपत्ती देखील जप्त केली आहे. मनी लॉड्रींग प्रकरणात ही कारवाई केली आहे. मागच्या काही वर्षांपासून ईडीच्या रडावर असणारे एकनाथ खडसे, अनिल देशमुख, विवेक पाटील आणि उद्योजक अविनाश भोसले यांच्या कोटींच्या संपत्तीवर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. आपण पाहुयात की नेमकी या नेत्यांची उद्योगपतींची प्रकरण काय आहेत आणि त्यांच्यावर जप्तीची कोणती कारवाई झाली आहे.

अनिल देशमुख आणि प्रकरण

राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे पहिल्या फळीतले नेता अशी त्यांची ओळख आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत अनिल देशमुख यांनी पोलीस प्रशासनाला आदेश देऊन गर्दी अटोक्यात आणण्याचं कामं केलं होतं. मात्र फेब्रुवारी महिन्यातील एका प्रकरणामुळं अनिल देशमुख चांगलेच अडकले. हे प्रकरण होते एंटालिया कार स्फोटक आणि मनसुख हिरण हत्या प्रकरण. हे प्रकरण योग्य पद्धतीनं हाताळलं नसल्यामुळं अनिल देखमुख यांनी तात्कालिन पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांची बदली केली. मात्र परमबीर सिंह या बदलीमुळं नाराज झाले आणि थेट मुख्यमंत्री आणि पोलिस महासंचालकांना पत्र लिहून अनिल देशमुख यांच्यावर 100 करोड रुपये वसूलीचे आरोप लावले. या आरोपामुळं अनिल देशमुख यांच्यावर हायकोर्टाच्या आदेशानंतर सीबीआयचा ससेमिरा मागे लागला तर ईडीनं देखील देशमुख यांना वारंवार समज बजावले आहेत. मात्र समज बजावून देखील अनिल देशमुख अद्याप ईडी कार्यालयात हजर राहिले नाहीत. अनिल देशमुख यांच्या वतीनं ईडी कार्यालयात त्यांचे वकील उपस्थित राहतात. मात्र प्रत्येक्ष अनिल देशमुख कधीच उपस्थित राहिले नाहीत.

अनिल देशमुख यांच्यावरील कारवाई

100 कोटी वसूली प्रकरणात अनिल देशमुख यांच्याशी निघडीत असेल्या निवासस्थानी सीबीआय आणि ईडीनं अनेकदा धाडी टाकल्या आहेत. या धाड सत्रता अनिल देशमुख यांची काही संपत्ती देखील ईडीनं जप्त केली आहे. ईडीनं ही कारवाई पीएमएल ए अंतर्गत केली आहे . या कारवाईत अनिल देशमुख यांच्या कुटुंबीयांची 4.40 कोटीची संपत्ती जप्त केली आहे. यामध्ये अनिल देशमुख यांचं वरळीतील घर ज्याची किंमत 1.54 कोटी आहे. तर रायगडमधली 2.67 कोटीची किमतीची जमीन देखील जप्त केलीय. ईडीकडून ही कारवाई आय पी सी 120 बी , 1860 आणि पीएमकायदा 1988 च्या कलम 7 नुसार केली आहे.

एकनाथ खडसेंवरही कारवाई

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्यामागे लागलेला चौकशीचा ससेमिरा सुरूच आहे. आता सक्तवसुली संचालनालयानं (ED) खडसे यांची जळगाव व लोणावळ्यातील मालमत्तात जप्त केली आहे. जप्त केलेल्या मालमत्तेची किंमत सुमारे ५ कोटी इतकी आहे. पुणे जिल्ह्यातील भोसरी एमआयडीसी भूखंड घोटाळ्याच्या प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. भाजपा सरकारच्या काळात महसूलमंत्री असताना खडसे यांनी भोसरी एमआयडीसी येथील एक भूखंड तीन कोटी ७५ लाख रुपयांना खरेदी केला होता. हा व्यवहार खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे व जावई गिरीश चौधरी यांच्या नावे करण्यात आला होता. या भूखंडाची किंमत ४० कोटी रुपयांपेक्षा जास्त असताना त्याचे बाजारमूल्य कमी दाखविण्यात आल्याची तक्रार करण्यात आली होती. नव्या जमीन अधिग्रहण कायद्यानुसार या जमिनीचे मूल्य दुप्पट म्हणजे ८० कोटी रुपये आहे. याचा फायदा घेण्याचा प्रयत्न खडसे कुटुंबीयांनी केल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलं होतं. तेव्हापासून खडसे व त्यांचे कुटुंबीय या प्रकरणात अडकले आहेत. एकनाथ खडसेंवर कारवाई झालीच मात्र त्याचबरोबर मागच्या दोन महिन्यांमध्ये आणखी एक मोठी कारवाई झाली ती अविनाश भोसले या उद्योगपतींवर. अविनाश भोसले पुण्यातील उद्योगपती आहेत. त्यांचे अनेक राजकीय नेत्यांसोबत जवळचे संबंध आहेत . अविशान भोसले हे कॉंग्रेसचे नेते विश्वजीत कदम यांचे सासरे आहेत.

अविशान भोसले यांच्यावरील कारवाई -

पुण्यातील व्यावसायिक अविनाश भोसले यांच्या मालकीच्या अविनाश भोसले इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडच्या 4 कोटी रुपये किंमतीच्या जमिनीवर ईडीने तात्पुरती टाच आणली आहे. मनी लॉन्डरिंग प्रकरणी (Prevention of Money Laundering Act,2002) ईडीने ही कारवाई केली आहे. जप्ती आणलेल्या जमिनीवर भोसलेंच्या मालकीच्या ABIL कंपनीचे कार्पोरेट ऑफिस आहे. नोकरशहांच्या घरांच्या बांधकामासाठी आरक्षित भूखंडावर भोसले यांनी व्यावसायिक इमारत बांधली. या बांधकाम व्यवहाराची ईडी चौकशी करीत आहे. भोसलेची रिअल इस्टेट कंपनी ‘एबीआयएल’ विरुद्ध पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरवर ईडीचा खटला आधारित आहे. भोसले यांनी नियमावलीत फेरफार करून भूखंड ताब्यात घेण्यास व्यवस्थापित केले आणि नंतर त्या भूखंडावर व्यावसायिक संकुल बांधल्याचा आरोप आहे.

माजी आमदार विवेक पाटलांवर कारवाई -

या सगळ्या प्रकरणानंतर ईडीनं सगळ्यात मोठी कारवाई केली आहे ती कर्नाळा बँक घोटाळेचे आरोपी माजी आमदार विवेक पाटील यांच्यावर. कर्नाळा बँकेत घोटाळा झाल्याचं प्रकरण 2008 मध्ये उघड झालं होतं. याच प्रकरणी ईडनी विवेक पाटील यांच्यावर कारवाई केली. माजी आमदार विवेक पाटील यांच्याशी संबंधित मालमत्ता जप्तीची मोठी कारवाई सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीने केली आहे. मनी लॉड्रिंग प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. विवेक पाटील यांची जवळपास 234 कोटी रुपयांची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. विवेक पाटील हे कर्नाळा बँकेचे माजी चेअरमन आहेत. या बँकेत सुमारे 650 कोटी रुपयांचा घोटाळा झाला होता. या घोटाळ्याचा आरोप विवेक पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर आहे. 2008 साली हा घोटाळा उजेडात आला होता. त्याबाबत आता ईडीने मोठी कारवाई केली आहे

नेमकं प्रकरण काय?

कर्नाळा बँकेत 650 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा उघडकीस आल्यानंतर बँकेच्या व्यवहारांवर मर्यादा आली होती. ठेवीदार आणि खातेधारकांना त्यांच्या हक्काचे पैसे परत मिळावे यासाठी पनवेल मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर आणि उरण मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांनी खातेदार आणि ठेवीदार संघर्ष समितीच्या माध्यमातून जनतेचा आवाज शासनापर्यंत पोहोचवला होता. बँकेच्या विरोधात ठेवीदारांसोबत आंदोलनही केले होते.यासंदर्भात आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांना ईडी कार्यालयात बोलवलं होतं. दोन्ही आमदारांनी आपले म्हणणे ईडी कार्यालयात जाऊन मांडले होते. घोटाळ्यासंदर्भातील पुरावे सादर केले असल्याची माहिती पुढे आली होती. ईडीच्या चौकशीमुळे बँक आणि शेतकरी कामगार पक्षाचे नेते माजी आमदार विवेकानंद पाटील यांच्यावर आता टांगती तलवार होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.