ETV Bharat / city

राज ठाकरे यांना ईडीची नोटीस; 22 ऑगस्टला हजर राहण्याचे आदेश

ईडीने कोहिनूर मिलप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना नोटीस बजावली आहे. काही दिवसांपूर्वीच राज ठाकरेंनी एका कार्यक्रमात वक्तव्य केले होते की, मी ईडीला घाबरत नाही, त्यांनी चौकशी करावी.

राज ठाकरे
author img

By

Published : Aug 19, 2019, 4:14 AM IST

Updated : Aug 19, 2019, 7:38 AM IST

मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडीने कोहिनूर मिलप्रकरणी नोटीस बजावली आहे. यासंदर्भात येत्या 22 ऑगस्टला ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश राज ठाकरे यांना देण्यात आले आहेत. याप्रकरणी राज ठाकरे यांच्या सोबत शिवसेनेचे नेते आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे चिरंजीव उन्मेष जोशी यांनाही उद्या ईडीकडून नोटीस बजावली जाण्याची शक्यता आहे. अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान, सरकार हे सूडबुद्धीने करत असून याबाबत सरकार विरोधात रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्याचा इशारा मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दिला आहे. तर ईडीने खुशाल चौकशीला यावं, मला फरक पडत नाही असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या ईडी प्रकरणावरील एका पत्रकार परिषदेत म्हटले होते.

काय आहे 'ईडी' प्रकरण?

बुडीत निघालेली 'आयएल अँड एफएस' कंपनी मागील काही महिन्यांपासून संकटात आहे. या कंपनीने अनेक ठिकाणी गुंतवणूक केली आहे. यापैकी एक म्हणजे दादरमधील कोहिनूर सीटीएनएल. आयएल अँण्ड एफएस ही एक नामवंत फायनान्स कंपनी होती. मात्र, कंपनीबाबत बऱ्याच तक्रारी असल्याने कंपनीविरोधात दिल्ली येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आयएल अँण्ड एफएसने मुंबईतील एका कंपनीला मोठ्या प्रमाणात कर्ज दिल्याचे चौकशीदरम्यान उघडकीस आले. कोहिनूर स्क्वेअर टॉवर्सला उभं करण्यासाठी मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना नेते, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचा मुलगा उन्मेष जोशी यांनी गुंतवणूक केली होती. आयएल अँण्ड एफएसचा या व्यवहाराशी कसा संबंध आहे याची चौकशी सध्या ईडी करत आहे.

उन्मेष जोशी यांच्या कंपनीला सुमारे 500 कोटी रुपयांचे कर्ज दिले होते, ते कंपनीला चुकते करणे शक्य नसल्याने त्या 500 कोटी रुपयांच्या बदल्यात जागा घेण्याचा आयएल अँण्ड एफएस कंपनीने निर्णय घेतला. साधारण 2011 साली आयएल अँण्ड एफएसने उन्मेष यांच्या कंपनीकडून 500 कोटींची जागा घेतली. मात्र, या व्यवहाराबाबतची नोंदणी 2017 साली करण्यात आली. हा संशयास्पद व्यवहार असल्याचे ईडीच्या सूत्रांचे म्हणणे आहे.

Intro:मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडीने कोहिनुर मिल प्रकरणी नोटीस बजावली आहे. येत्या 22 तारखेला ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश राज ठाकरे यांना देण्यात आले आहेत. याप्रकरणी राज ठाकरे यांच्या सोबत शिवसेनेचे नेते आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे चिरंजीव उन्मेष जोशी यांनाही उद्या ईडीकडून नोटीस बजावली जाण्याची शक्यताअसल्याची माहिती सूत्रांनी दिली.Body:सरकार हे सूडबुद्धीने करत असून याबाबत सरकार विरोधात रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्याचा इशारा मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दिला आहे.
ईडीने खुशाल चौकशीला यावं, मला फरक पडत नाही असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या ईडी प्रकरणावर एका पत्रकार परिषदेत म्हटलं होतं.
काय आहे ईडी प्रकरण
बुडीत निघालेली आयएल अण्ड एफएस कंपनी मागील काही महिन्यांपासून संकटात आहे. या कंपनीने अनेक ठिकाणी गुंतवणूक केली आहे, यापैकी एक म्हणजे दादरमधील कोहिनूर सीटीएनएल. 
आयएल अण्ड एफएस ही एक नामवंत फायनान्स कंपनी होती मात्र कंपनीबाबत बऱ्याच तक्रारी असल्याने कंपनीविरोधात दिल्ली येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आयएल अण्ड एफएसने मुंबईतील एका कंपनीला मोठ्या प्रमाणात कर्ज दिल्याचं चौकशीत उघडकीस आलं. 
कोहिनूर स्क्वेअर टॉवर्सच्या उभं करण्यामागे मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना नेते, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचा मुलगा उन्मेष जोशी यांनी गुंतवणूक केली होती. आयएल अण्ड एफएसचा या व्यवहाराशी कसा संबंध आहे याची चौकशी सध्या ईडी करत आहे.
उन्मेष जोशी यांच्या कंपनीला सुमारे 500 कोटी रुपयांचं लोन दिल होतं, ते कंपनीला चुकतं करणं शक्य नसल्याने त्या 500 कोटी रुपयांच्या बदल्यात जागा घेण्याचा आयएल अण्ड एफएस कंपनीने निर्णय घेतला. साधारण 2011 साली आयएल अण्ड एफएसने उन्मेष यांच्या कंपनीकडून 500 कोटींची जागा घेतली, मात्र या व्यवहाराबाबतची नोंदणी 2017 साली करण्यात आली. हा संशयास्पद व्यवहार असल्याचं ईडीच्या सूत्रांचं म्हणणं आहे.

Conclusion:
Last Updated : Aug 19, 2019, 7:38 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.