ETV Bharat / city

सहकार राज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्या सासु गौरी भोसलेंची ईडीकडून चौकशी - vishwajit kadam

गौरी भोसले या पुण्यातील प्रसिद्ध व्यावसायिक अविनाश भोसले यांच्या पत्नी आहेत. त्यांची फेमा अंतर्गत पुन्हा एकदा चौकशी करण्यात आली आहे.

सहकार राज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्या सासु गौरी भोसलेंची ईडीकडून चौकशी

author img

By

Published : Feb 3, 2021, 1:14 PM IST

मुंबई - राज्याचे सहकार राज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्या सासु गौरी भोसले यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली आहे. यापूर्वी विश्वजीत कदम यांच्या पत्नीलाही ईडीकडून फेमा अंतर्गत चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले होते. तसेच त्यांची चौकशीही करण्यात आली होती.

गौरी भोसले या अविनाश भोसले यांच्या पत्नी
पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांची नोव्हेंबर 2020 मध्ये ईडीकडून चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर अविनाश भोसले यांच्या पत्नी गौरी भोसले यांची फेमा अंतर्गत पुन्हा एकदा चौकशी करण्यात आली आहे. परदेशात करण्यात आलेल्या आर्थिक व्यवहारांसंदर्भात ही चौकशी झाली आहे. याआधी अविनाश भोसले यांच्या पुणे आणि मुंबईतील 23 ठिकाणांवर आयकर विभागाकडून छापेमारी करण्यात आली होती.

डीआरआयकडून झाली होती अटक
यापूर्वी अविनाश भोसले यांची 2007 मध्ये डीआरआयकडून चौकशी करण्यात आली होती. 2007 मध्ये लंडनवरून दुबईमार्गे मुंबईत विमानतळावर उतरल्यानंतर अविनाश भोसले यांच्याकडे असलेल्या विदेशी सामानाच्या करासंदर्भात डीआरआयकडून त्यांना अटक करण्यात आली होती. यानंतर त्यांना जामीनावर सोडण्यात आले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.