ETV Bharat / city

ईडीकडून मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात दाऊद इब्राहिमचा भाचा अलीशाह पारकरची चौकशी - अलीशाह पारकर चौकशी ईडी

आज दाऊद इब्राहिमचा भाचा अलीशाह पारकरची मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात चौकशी केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

Dawood Ibrahim
दाऊद इब्राहिम
author img

By

Published : Feb 21, 2022, 9:41 PM IST

Updated : Feb 21, 2022, 10:20 PM IST

मुंबई - ई़डीने मुंबईत आज विविध ठिकाणी छापेमारी केली. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ही संयुक्त छापेमारी आहे. मागील आठवड्यात मुंबईत 10 ठिकाणी छापेमारी केली होती तर, आज 6 ठिकाणी छापेमारी केली आहे. आज दाऊद इब्राहिमचा भाचा अलीशाह पारकरची मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात चौकशी केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

हेही वाचा - Disha Salian Case : दिशा सालियन प्रकरणात महिला आयोगाने दिला पोलिसांना 'हा' आदेश

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर ईडी कस्टडीमध्ये आहे. ईडी अधिकाऱ्यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात इक्बाल कासकरकडून महत्त्वाचे लीड मिळाल्यानंतर आज धाडी टाकण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

  • Mumbai | Enforcement Directorate interrogates Dawood Ibrahim's nephew Alishah Parkar, in connection with a money laundering case.

    — ANI (@ANI) February 21, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

ईडीकडून इंडियाबुल्स फायनान्स सेंटर येथे काही कार्यालयात छापेमारी

अंमलबजावणी संचालनालयाने मुंबईतील इंडियाबुल्स फायनान्स सेंटर येथे काही कार्यालयात छापेमारी केली. ईडी दिल्ली आणि मुंबई यांच्या संयुक्त मोहिमेतून ही छापेमारी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पीएमएलए कायदा 2002 अंतर्गत ही छापेमारी सुरू असल्याची माहिती आहे.

इंडियाबुल्स हाऊसिंगचे प्रमोटर समीर गेहलोत यांच्याशी संबंधित कंपन्यांच्या निमित्ताने ही छापेमारी सुरू आहे, अशी सूत्रांची माहिती आहे. या आधीच्या 2014 आणि 2020 मध्ये झालेल्या पैशांच्या हेराफेरीच्या प्रकरणातील गुन्ह्यांच्या अहवालावर आधारीत ही छापेमारी करण्यात आल्याचे कळते.

हेराफेरी आणि ऑडिटमधील अनियमिततेच्या प्रकरणात इंडियाबुल्स समुहाच्या कंपन्यांच्या विरोधात एप्रिल 2021 मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामध्ये इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्सच्या कंपनीचाही समावेश आहे. दिल्ली आणि मुंबईच्या ईडीच्या टीमने संयुक्त अशा पद्धतीने या प्रकरणात छापेमारी केली आहे.

पालघरमध्ये नोंदवण्यात आलेल्या एका तक्रारीच्या आधारावर ही छापेमारीची कारवाई करण्यात आली असल्याचे कळते. कंपनीने पैशाची हेराफेरी करतानाच वाढीव किंमतीसाठी शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली होती. प्राथमिक स्वरुपातील तक्रारीमध्ये तक्रारदाराने रियल इस्टेट कंपन्यांचाही उल्लेख केला होता. या कंपन्यांनी इंडियाबुल्सकडून कर्ज घेतले होते. पण, कर्जाची रक्कम ही इंडियाबुल्स हाऊसिंगच्या शेअर्समध्ये पाठवण्यात आली होती.

हसीना पारकरच्या घरी ईडीच्या टीमने छापा टाकला होता

ईडीने आणि एनआयएने याआधी गेल्याच आठवड्यात मुंबईत दहा ठिकाणी छापे मारले होते. त्यामध्ये अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित मालमत्तांच्या ठिकाणी ही छापेमारी झाली होती. दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकरच्या घरी ईडीच्या टीमने छापा टाकला होता. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ही छापेमारी झाली होती. त्यामध्ये काही राजकीय नेत्यांचेही कनेक्शन असल्याचे बोलले जात होते. ईडीने गॅंगस्टर छोटा शकीलचा नातेवाईक सलीम फ्रुट यालाही ताब्यात घेतले होते. सलीम फ्रूटला ताब्यात घेत 9 तास चौकशी केली होती. त्याच्या चौकशीत काही महत्त्वाच्या बाबी देखील समोर आल्या आहेत. त्यानंतर ईडीने दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्‍बाल कासकर याची कस्टडी मुंबई सत्र न्यायालयात मागितल्यानंतर त्याला सात दिवसांच्या कस्टडीत पाठवण्यात आले. सध्या इक्‍बाल कासकर हा ईडी कस्टडीत असून ईडीला मिळालेल्या माहितीनुसार, ईडीने छापेमारी केली असल्याची माहिती देखील सूत्रांकडून मिळाली आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसारस, एकूण सहा मालमत्तांची चौकशी सुरू आहे. या मालमत्तांचा संबंध काही राजकीय नेते, 1993 बॉम्ब स्फोटातील आरोपी, हसिना पारकर यांच्याशी संबंध असल्याची माहिती समोर येत आहे. या धाडसत्रात एनआयएच्या टीमचीही तपासात मदत घेतली जात असल्याची माहिती समोर येत आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमची संपत्ती आणि महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांमध्ये झालेल्या काही जागांच्या व्यवहारांबाबत हे धाडसत्र सुरू असल्याचे बोलले जात आहे. मात्र, या संदर्भात अद्याप कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. तसेच, हे राजकीय नेते कुठल्या पक्षाचे आहे आणि कोण आहे, याबाबतही कुठलीही अधिकृत माहिती अद्याप मिळू शकलेली नाही.

हेही वाचा - ED Raid India Bulls : ईडीची इंडिया बुल्सच्या मुंबईतील ऑफिसवर छापेमारी

Last Updated : Feb 21, 2022, 10:20 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.