मुंबई - सुशांतसिंह राजपूत आर्थिक व्यवहार प्रकरणी तपास करणाऱ्या 'ईडी'कडून गौरव आर्या याला चौकशीसाठी समन्स बजाविण्यात आला आहे. यानंतर गौरव आर्या हा रविवारी मुंबईत दाखल होत आहे. यासोबतच सीबीआयकडून सुशांतसिंह राजपूत याची बहीण मीतूसिंह हिला सुद्धा चौकशीसाठी समन्स बजाविण्यात आले आहे. यामुळे सोमवारी सकाळी 11 वाजता मीतूसिंह ही सीबीआय पथकासमोर चौकशीसाठी हजर राहणार आहे.
सुशांतसिंहची मैत्रिण रिया चक्रवर्ती आणि गौरव आर्या यांच्या दरम्यान झालेले व्हाट्सअॅप चॅट डिलीट केल्यानंतर ईडीने पुन्हा मिळवले आहेत. गौरव आर्या व रिया चक्रवती यांच्यात अमली पदार्थांच्या बाबतीत संभाषण झाल्याचं समोर आल्यानंतर इडीकडून हे व्हाट्सअप चॅट सीबीआय व नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या पथकाला देण्यात आले होते. यानंतर ईडीकडून गौरव आर्या याला चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले होते. यानुसार 31 ऑगस्टला सकाळी 11 वाजता गौरव आर्याला चौकशीसाठी हजर राहावे लागणार आहे.
हेही वाचा - रिया चक्रवर्ती तिसऱ्या दिवशीही सीबीआयसमोर चौकशीला हजर