मुंबई - राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत अर्थसंकल्प सादर केला. त्यानंतर महाविकास आघाडीच्या या अर्थसंकल्पावर विरोधकांनी निराशजनक आणि मागच्याच योजना या अर्थसंकल्पात समाविष्ट केली असल्याची आणि भाजपाच्याच घोषणा उचलल्या असल्याची टीका केली. त्यावर अजित पवार यांनी अर्थसंकल्पातील घोषणांवर काय भाजपाची मक्तेदारी आहे का? असा प्रतिसवाल करत भाजपावर निशाणा साधला आहे.
अर्थसंकल्प मांडणे आमच्या समोर नवे नाही. कर रुपाने येणारे पैसे कमी झाले आहे. केंद्राकडून अद्यापही ३२ हजार कोटी रुपये येणे बाकी आहे. मार्च अखेर पर्यंत तो द्यावा अशी सर्वच राज्याची मागणी आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साडेसात हजार कोटीचा कार्यक्रम आम्ही राबवतो. पोस्ट कोविडसाठी काळजी घेत उपायोजना या अर्थसंकल्पातून केला आहे. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिलांसाठी घर खरेदीसाठी नवीन योजना जाहीर केली. असल्याचेही पवार म्हणाले.
ग्रामीण भागात महिला राहात नाहीत का? शेतकऱ्यामुळे आपला जीडीप टिकून राहिला आहे. म्हणून शेतकऱ्यांसाठी ३ लाखापर्यंत शून्य टक्के दरांने पीक कर्ज वाटप करणार, शेतकऱ्यांसाठी १५ हजार रुपये वीज बिल भरण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे बळकटीकरण करण्यासाठी दोन हजार कोटी रुपयांची योजना घोषित कोेली. तरुणांच्या बाबतीत २ वर्षात कौशल विकास कार्यक्रमातून ५ हजार रुपये देणार आहोत.
क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले प्रवास योजना, सीएनजी १५०० बसेस एसटी महामंडळाला देणार.. विद्यार्थ्यांना महाविद्यालयात पोहोचवण्याची सोय करणार.. हायब्रीड सीएनजी बसमुळे पर्यावरणाचेही नुकसान होणार नाही.राखीव पोलीस दल स्वतंत्र महिला गट स्थापन करणार असल्याचेही अर्थसंकल्प अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली
जागतिक महिला दिनी हे अर्थसंकल्प सादर होत असताना महिलांसाठी विशेष तरतूद केलीय. घर घेताना मुद्रांक शुल्कात 20 % सूट दिली आहे. घरकाम करणाऱ्या महिलांना करीत संत जना बाईंच्या नावाने असलेल्या योजनेला अडीचशे कोटी आपण दिलेत.
शेतकऱ्यांसाठी पीक कर्जात शून्य टक्के दराने व्याजदर
शेतकऱ्यांमुळे 8 % GDP राहिलेला आहे. सर्व्हिस सेकटर मध्ये जबरदस्त फटका बसला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांसाठी 0 टक्के व्याजाने ३ लाखापर्यंत पीक कर्ज देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचे व्याज आम्ही भरणार आहोत. कर्जमुक्ती दिली , आता कर्ज काढा मुद्दल भरा व्याज आम्ही भरतो हाय निर्णय आम्ही घेतला आहे. वीज बिल बाबत १५ हजार रुपयच भरा , बाकी माफ केला
नवीन वैद्यकीय महाविद्यालय आपण सुरू करणार आहोत. एक मेडिकल कॉलेज सुरू झालं की 700 बेडचं रुग्णालय सुरू होतात, त्याचा फायदा जनतेला होईल. फसवं विज्ञान लोकांना सांगून दिशाभूल करायची, हे होऊ नये म्हणून विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा उपयोग करता यावा म्हणून 300 करोड ची वार्षिक तरतूद करतोय.
बाजारात शेतकरी माल घेऊन जातात, पण तिथे राहणयातसाठी 4 वर्षात 2 हजार कोटी रुपये खर्चून इन्फ्रास्त्रकचर सुरू करतोय. पिकेल ते विकेल पण तिथे शेतकऱ्यांना सुविधा द्यायला हवी. ADB बँकेला १० हजार कोटी रुपये कॅबिनेट मध्ये रस्त्यांसाठी देण्यात आलेले आहेत.
मल्टी मॉडेल कॉरिडॉर विरार ते अलिबाग केला जाईल. जालना ते नांदेड साठी नवीन समुद्रिमहामार्गाला जोडणारा रस्ता प्रकल्प हाती घेतलेले आहे. नाशिक-पुणे अति जलद रेल्वे प्रकल्प हाती घेतल आहे. पुण्यात रिंग रोड प्रकल्प ला प्राधान्य दिले आहे. ग्रामीण रस्त्याला तरतूद केली असल्याचेही अजित पवार यांनी यावेळी सांगितले.
या घोषणा काय भाजपाच्या आहेत का? त्यांची मक्तेदारी आहे का?
महाज्योती , सारथी , बार्टीसह सगळ्या मंडळांना आपण निधीची तरतूद केली आहे. प्राचीन मंदिराकडे कोणी लक्ष दिलं न्हवते ,तो कार्यक्रम हाती घेतला आहे. महिलांसाठी सौलात दिलीय
त्यामुळे भार सहन करावा लागणार आहे. 1 हजार कोटींची तूट आहे , 0% भाजपची भूमिका आहे ? आता ज्या घोषणा आहेत त्या भाजपच्या घोषणा आहेत का ? त्यांची ही मक्तेदारी आहे काय ? आम्ही साधुसंत नाही, सरकार आपला वाटेल, जनतेला कार्यक्रम आवडेल, तो राबवणार भविष्यात महाविकास आघाडीचा विचार करायला हवा सरकारने असेही अजित पवार यावेळी माध्यमांशी बोलताना म्हणाले. मुंबई महानगर पालिकेलेच सगळे प्रश्न हे आहेत का? देशाची आर्थिक राजधानी आहे , मग त्यासाठी तरतूद करायला नको का? त्यांचा मुंबईवरच राग स्पष्ट होतो,अशी टीका मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.
त्यांच्यापेक्षा जास्त आम्ही दिले-
विदर्भ मराठवाडा विकास महामंडळ केली नाही, असं ते म्हणतायत त्यांना राजकारण करायचं आहे , त्यांचं त्यांना लखलाभ असे. लोकसंख्येनुसार विदर्भातील २३ मराठवाड्याला १८ उर्वरित महाराष्ट्राला ५८ % मिळाले असते
त्यांना आम्ही प्रदेश निहाय वाटनची टिपणी दिली आहे. २६% विदर्भला दिले आहेत, ३% अधिक दिलेलंत, त्यांच्यापेक्षा अधिक आम्ही दिलेत. प्रदेशनिहाय वाटपाचे पैसे दिले आहेत , त्यांनी पहावे असेही अजित पवार यांनी म्हटले आहे.
इंधनावर केंद्राने कर कमी करावेत-
इंधनाच्या बाबतीत केंद्राने कर कमी कराव ही आमची मागणी आहे. बॅरलची किंमत मनमोहन सिंग यांच्या काळात काय होती आणि आज काय आहे , आणि दिघांनी आकारलेले कर पाहावेत, असेही अजित पवार यांनी इंधन दरवाढी आणि कर रचनेवर बोलताना दिली.