ETV Bharat / city

मुंबई तुंबली...पूर्व उपनगरातही पाणीच पाणी!

मुख्य शहरासह पूर्व उपनगरात रात्रीपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. भांडुप ,मुलुंड, घाटकोपर, कुर्ला, चेंबूर टिळक नगर आदी ठिकाणी मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचले आहे. त्यामुळे वाहतुक मंदावली आहे.

heavy rainfall in mumbai
मुंबई तुंबली...पूर्व उपनगरातही पाणीच पाणी!
author img

By

Published : Aug 4, 2020, 10:45 AM IST

मुंबई - मुख्य शहरासह पूर्व उपनगरात रात्रीपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. भांडुप ,मुलुंड, घाटकोपर, कुर्ला, चेंबूर टिळक नगर आदी ठिकाणी मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचले आहे. त्यामुळे वाहतुक मंदावली आहे.

मुंबईसह पूर्व उपनगरात मध्यरात्रीपासून पडत असलेल्या मुसळधार पावसाने मंगळवारी सकाळी सखल भागात पाणी साचल्याने जनजीवन ठप्प झाले. तसेच पूर्व पूर्वउपनगरातील लोकवस्तीच्या ठिकाणी नागरिकांच्या घरात पाणी शिरले असून पावसाचा जोर आणखीन वाढत असल्याने पालिकेतर्फे नागरीकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

कुर्ला एलबीएस मार्गासहीत, नेहरूनगर, घाटकोपर, चेंबूर आदी ठिकाणी घरात पाणी शिरल्याने नागरिकांची तारांबळ उडाली आहे. तब्बल मुंबई पूर्व उपनगरात एकूण १६२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तरीही हवामान खात्याने येत्या २४ तासांत पूर्व उपनगरासहीत मुंबईत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन मुंबई आपत्कालीन विभागाकडून करण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.