ETV Bharat / city

एनसीबीने वर्षभरात पकडले 300 कोटींचे ड्रग्स; 300 जणांवर कारवाई - नार्कोटिक्स विभागाची कारवाई

गेल्या वर्षभरात एनसीबीने जवळपास 300 अमलीपदार्थ विक्री करणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. तसेच तब्बल 300 कोटी रुपयांचे अमलीपदार्थ पकडले असल्याची माहिती एनसीबीने दिली आहे. यामध्ये 30 किलो चरस, 12 किलो हेरॉईन, 350 किलो गांजा आणि 25 किलो एमडी औषध जप्त केले आहे.

एनसीबीने वर्षभरात पकडले 300 कोटींचे ड्रग्स; 300 जणांवर कारवाई

author img

By

Published : Sep 24, 2021, 10:02 AM IST

मुंबई - अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणानंतर राज्यात एनसीबी म्हणजेच नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो विभाग सक्रीय झाल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या वर्षभरात एनसीबीने जवळपास 300 अमलीपदार्थ विक्री करणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. तसेच तब्बल 300 कोटी रुपयांचे अमलीपदार्थ पकडले असल्याची माहिती एनसीबीने दिली आहे. यामध्ये 30 किलो चरस, 12 किलो हेरॉईन, 350 किलो गांजा आणि 25 किलो एमडी औषध जप्त करण्यात आल्याचीही माहिती एनसीबीने दिली.

मुंबईत अमलीपदार्थ तस्कारांचे मोठे नेटवर्क पसरल्याचे गेल्या काही दिवसातील कारवायांवरून समोर आले आहे. या विरोधात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून छापेमारी करत कारयावा करण्यात येत आहेत. विदेशातून मोठ्या प्रमाणात अमली पदार्थाची तस्करी होत असल्याचेही पोलिसांच्या कारवाईत स्पष्ट होत आहे. दरम्यान अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात बॉलिवूडचे देखील अमलीपदार्थ तस्करांशी संबंध असल्याचे समोर आले होते.

एनसीबीची कारवाई -

जानेवारी महिन्यात मुंबईतील प्रसिद्ध ‘मुच्छड पानवाला’ दुकानाच्या मालकाला बेड्या ठोकण्यात आल्या. जयशंकर तिवारी याला ‘मुच्छड पानवाला’ नावाने ओळखलं जातं. अनेक हायप्रोफाइल उद्योजक, सेलिब्रेटी तसंच क्रिकेटर मुच्छड पानवाल्याचे ग्राहक होते. ड्रग्ज प्रकरणात ब्रिटीश नागरिक करण सजनानीच्या अटकेनंतर करण्यात आलेल्या चौकशीत मुच्छड पानवाल्याचे नाव समोर आले होते. जून महिन्यात फॉरेन पोस्ट ऑफिस या ठिकाणी छापा मारला असता, त्या ठिकाणी 2 किलो 200 ग्रॅम कॅनबिज अंमली पदार्थ मिळून आले होते. सदरचे अमलीपदार्थ एका निळ्या कलरच्या कार्टून बॉक्समध्ये लपविण्यात आले होते. जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थाची किंमत 5000 ते 8000 रुपये प्रतिग्राम असून हे पार्सल कॅनडामधील विटर येथून मुंबईला पाठवण्यात आले होते.

एनसीबीकडून सिने अभिनेते, अभिनेत्रींवर कारवाई -

अभिनेता सुशांत सिंह याने मागीलवर्षी राहत्या घरात आत्महत्या केली होती. या प्रकरणात सुशांत सिंग ड्रग्स घेत असल्याचे समोर आले आहे. त्यानंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने चौकशी सुरू केली होती. या चौकशी दरम्यान अमली पदार्थ खरेदी आणि सेवन प्रकरणात सुशांत सिंहची मैत्रीण रिया चक्रवर्ती आणि तिच्या भावाला अटक करण्यात आली होती. त्यानतंर त्यांना जामिनावर सोडण्यात आले. तसेच ऑगस्टमध्ये आणखी एका प्रकरणात अभिनेता अरमान कोहली याच्या घरावर एनसीबीने छापा मारला होता. त्याला एनसीबीने अटकही केली होती.

मुंबई विमानतळावर 10 कोटींचे अमली पदार्थ जप्त -

मुंबई विमानतळावर एनसीबीने 8 ऑगस्टला मोठी कारवाई केली होती. या कारवाई दरम्यान 10 कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले होते. हे अमली पदार्थ एका विदेशी अमली पदार्थ तस्कराच्या पोटातून काढण्यात आले आहेत. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोनं आरोपीला छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्टवर त्याला अटक केली होती. गुप्त माहिती दाराच्या माहितीवरून ही कारवाई करण्यात आली. यात आरोपीने गुन्ह्यासाठी विदेशी टॅक्टिक वापरल्या होत्या. यामध्ये आरोपीने आपल्या पोटामध्ये 1.050 किलो कोकेन हे अमली पदार्थ लपवले होते.

हे ही वाचा - मुंद्रा हेरॉईन प्रकरणाच्या चौकशीत 'ईडी'चाही समावेश; 21 हजार कोटींचे ड्रग्ज करण्यात आले होते जप्त

हेही वाचा - कोरोना झाल्यानंतर आत्महत्या करणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांना मिळणार 50 हजारांची मदत - केंद्र सरकार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.