ETV Bharat / city

वाहनचालकांना दिलासा! ड्रायव्हिंग लायसन्स नुतनीकरणास ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ - Driving license renewal extended

वाहनचालकांना दिलासा देणारी बातमी आहे. ड्रायव्हिंग लायसन्स नुतनीकरणासाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. कोरोना, लॉकडाऊनमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

Driving license renewal
Driving license renewal
author img

By

Published : Jun 17, 2021, 8:32 PM IST

मुंबई - कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी देशातील अनेक राज्य सरकारने लॉकडाऊन लागू केला आहे. यामुळे ड्रायव्हिंग लायसन्ससह वाहन नोंदणी, वाहन योग्यता प्रमाणपत्र (फिटनेस), पीयूसी यांची वैधता संपल्यामुळे चिंता करणाऱ्या चालक व मालकांना केंद्र शासनाच्या रस्ते, परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाने प्रवासी व माल वाहतूक वाहनांशी संबंधित कागदपत्रांच्या नुतनीकरणास शासनाने ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे वाहन धारकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

केंद्र शासनाने सहाव्यांदा दिले मुदतवाढ-

केंद्र शासनाने गेल्या दीड वर्षांपासून या मुदतवाढीमध्ये सातत्याने वाढ केली जात आहे. वाहनांशी संबंधित कागदपत्रांची वैधता संपलेल्या मालकांना याआधी पाचवेळा मुदतवाढ देण्यात आली होती. ही मुदत ३० जून २०२१पर्यंत होती. त्यानंतर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशातील बहुतांश आरटीओमधील सेवा बंद आहेत. तर काही आरटीओंमध्ये कर्मचाऱ्यांची संख्या मर्यादित केल्याने कामकाजावर विपरित परिणाम होत आहे. महत्त्वाची बाब म्हणजे कागदपत्र नुतनीकरणास आरटीओमध्ये गर्दी उसळल्यास कोरोनाचा प्रभाव वाढण्याची भीती केंद्र शासनाने व्यक्त केली आहे. परिणामी, कागदपत्र नुतनीकरणास पुन्हा एकदा सहाव्यांदा ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे.

३० सप्टेंबरपर्यंत कारवाई होणार नाही-

वाहन दुरुस्ती, सर्व प्रकारच्या वाहनांना परवानगी, वाहन चालविण्याचा परवाना, नोंदणी यासंबंधी कागदपत्रांची वैधता ही ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे आता ही कागदपत्रे तपासणारे अधिकारी ३० सप्टेंबरपर्यंत कोणतीही कारवाई करू शकणार नाही. त्यामुळे एकंदरीत या निर्णयामुळे कोट्यवधी चालक व मालकांना दिलासा मिळाला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.