मुंबई महसूल गुप्तचर संचालनालय (डीआरआय), मुंबईने ट्रॉली बॅगमध्ये बनावट पोकळीत ( DRI Mumbai arrested a person) लपवून ठेवलेले 80 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे 16 किलो उच्च दर्जाचे हेरॉईन जप्त केल्यानंतर केरळमधील एका व्यक्तीला विमानतळावर ( Airport after seizing 16 kg heroin ) अटक केली. एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू असल्याचे डीआरआयने म्हटले आहे.
जप्त केलेल्या ड्रग्जची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत 80 कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचे डीआरआयने सांगितले. बिनू जॉन असे अटक आरोपीचे नाव असून तो केरळचा रहिवासी आहे. डीआरआयला मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपी विमानतळावर पोहोचताच त्याला ताब्यात घेण्यात आले, त्याची झडती घेण्यात आली आणि त्याच्या सामानाची तपासणी करण्यात आली. त्याच्या सामानाची तपासणी केली असता, त्यावेळी काहीही आढळून आले नाही, त्यानंतरच त्याच्या ट्रॉली बॅगची कसून तपासणी केली असता, बॅगच्या बनावट पोकळीत ड्रग्ज सापडले. डीआरआयने एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवून त्याला अटक केली.
कमिशनसाठी काम केल्याचा दावा -आरोपी ड्रग्स तस्कर जॉनने डीआरआयला सांगितले की, एका परदेशी नागरिकाने त्याला भारतात नेण्यासाठी एक हजार अमेरिकन डॉलर्स कमिशन म्हणून दिले होते, आरोपीने इतर साथीदारांची नावे देखील उघड केली.डीआरआय आता या नावांची चौकशी करत आहे, याआधीही भारतात ड्रग्जच्या तस्करीत जॉनचा सहभाग होता का, याचाही शोध आता डीआरआय घेत आहे.