ETV Bharat / city

Ajit Pawar On MHADA Houses : म्हाडाचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध - अजित पवार - mhada online lottery

म्हाडाच्या 4222 नव्या घरांची ऑनलाइन सोडत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ( Ajit Pawar On MHADA Houses ) हस्ते पार पडली. यावेळी प्रत्येकाला हक्काचे घर मिळाले पाहिजे, हे राज्य शासनाचे धोरण आहे. तसेच, म्हाडाचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही पवार यांनी दिली.

Ajit Pawar
Ajit Pawar
author img

By

Published : Jan 9, 2022, 5:06 PM IST

मुंबई - प्रत्येकाला हक्काचे घर मिळाले पाहिजे, हे राज्य शासनाचे धोरण आहे. या अनुषंगाने सर्वांसाठी घरे हा कार्यक्रम राज्य सरकार राबवत आहे. पुण्यात 4 हजार 222 नवीन सदनिकांची सोडत निघाली. ही याच धोरणाच्या दिशेने पडलेले आश्वासक पाऊल असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar On MHADA Houses ) यांनी केले. तसेच, म्हाडाचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाहीही पवार यांनी दिली.

पुण्यात जिल्हा परिषदेच्या ( Pune Zilla Parishad ) नवीन सभागृहात पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या सुमारे चार हजार 222 नव्या घरांची ऑनलाइन सोडत पार पडली. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार मुंबईतून ( Deputy Chief Minister Ajit Pawar ) दूरदृश्य प्रणालीद्वारे संबोधित केले.

अजित पवार म्हणाले की, सामान्य माणसाला घर आणि बांधकाम क्षेत्राला गती देण्यासाठी राज्य शासनाने अनेक मोठे निर्णय घेतले. त्याचे चांगले परिणाम दिसत आहेत. कोरोना दरम्यान मुद्रांक शुल्कात कपात हा महत्त्वाचा निर्णय राज्य शासनाने घेतल्यानेमुळे बांधकाम क्षेत्राला ऊर्जा व स्थान मिळाले.

राज्यातल्या सर्वांना हक्काचे घर मिळावे यासाठी शहरी आणि ग्रामीण भागात विविध गृहनिर्माण योजनांची अंमलबजावणीची सुरुवात केली आहे. तसेच, सर्वांसाठी घर कार्यक्रमाअंतर्गत सर्वांना हक्काचे घर देण्याचा प्रयत्न सरकारचा आहे. लॉटरीच्या निमित्ताने हक्काची घरे मिळालेल्यांचे अभिनंदन करत ज्यांना घरे मिळाली नाहीत त्यांनी निराश न होता म्हाडाच्या पुढच्या सोडतीत भाग घेण्याचे आवाहनही पवार यांनी केले.

लसीकरण करण्याचे आवाहन

राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात ( Maharashtra Corona Cases Increased ) वाढ झाली आहे. कोरोनाला प्रतिबंध घालण्यासाठी लसीकरण महत्वाचे आहे. त्यामुळे सर्वांनी लसीकरण करण्याचे आवाहनही अजित पवार यांनी केलं आहे.

हेही वाचा - Liquor Shops Have To Close : ..तर दारुची दुकानेही बंद करावी लागतील, आरोग्यमंत्र्यांचा इशारा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.