ETV Bharat / city

CM Uddhav Thackeray : नालेसफाईची कामे 'या' तारखेपर्यंत पूर्ण करा; मुख्यमंत्र्यांच्या प्राधिकरणाला सूचना

पावसाळ्यात मुंबईत पाणी साचते. त्यामुळे मुंबईकरांचे मोठे हाल होतात. म्हणून नालेसफाईची कामे 31 मे पूर्वी पूर्ण करा, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray ) यांनी विविध प्राधिकरणाला दिल्या आहे.

CM Uddhav Thackeray
CM Uddhav Thackeray
author img

By

Published : Apr 6, 2022, 5:41 PM IST

मुंबई - दरवर्षी पावसाळ्यात मुंबई पाण्याखाली जाते. परिणामी मुंबईकरांचे मोठे हाल होतात. यंदा मुंबईत पाणी साचणार नाही, याची खबरदारी घ्या. नालेसफाई ३१ मे पूर्वी पूर्ण करा, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray ) यांनी मुंबई मनपासह ( Brihanmumbai Municipal Corporation ) विविध प्राधिकरणाला दिल्या. वर्षा या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पावसाळापूर्व कामकाजाचा आढावा घेतला.

मुंबईत दरवर्षी तीन टप्प्यात नालेसफाई केली जाते. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून नालेसफाईच्या कामाला सुरुवात होते. प्राधिकरणाकडून १०० टक्के नालेसफाई झाल्याचा दावा केला जातो. मात्र, पहिल्याच पावसात दावा फोल ठरतो. ही बाब विचारात घेत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पावसाळापूर्व कामांचा आढावा घेतला.

या बैठकीस राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, मुंबई मनपा आयुक्त इक्बाल सिंग चहल, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार सीताराम कुंटे, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार, एमएमआरडीएचे आयुक्त एस श्रीनिवासन, म्हाडाचे उपाध्यक्ष तथा कार्यकारी अधिकारी अनिल डिग्गीकर, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक, सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, मुंबई मंडळाचे महाव्यवस्थापक शलभ गोयल, पश्चिम रेल्वेचे जीबीएल सत्यकुमार, झोपडपट्टी पुनर्वसन योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश लोखंडे यांच्यासह आदी प्राधिकरणाचे वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.

31 मे पर्यंत त्या... - मुंबई महानगरात पावसाळ्यात पाणी साचून परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी एमएमआरडीए, रेल्वे, विमानतळ प्राधिकरण, म्हाडा, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि पोलीस या विविध विभागांनी कामांना गती द्यावी. मुंबईतील डेब्रिज तयार होण्याच्या 450 जागा असून, 31 मे पर्यंत त्या एमएमआरडीए आणि मुंबई मनपाने साफ करावेत, अशा सूचना मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिल्या.

पाणी तुंबणार नाही याची दक्षता घ्या - अर्धवट राहिलेली मेट्रोची कामे तातडीने कशी पूर्ण होतील, यावर भर द्यावा. पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्गावरील 47 कल्व्हर्ट, रेल्वे मार्गातील 40 कल्व्हर्ट नियोजित कालावधीत स्वच्छ करून घ्यावीत. डास मच्छरांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी उपाययोजना कराव्यात, पावसाळ्यापूर्वी रस्त्यावरील खड्डे बुजविण्यावर विशेष भर द्यावा. ज्या भागांमध्ये मेट्रोच्या व इतर सार्वजनिक कामे सुरू असतील त्या भागात पाणी तुंबणार नाही याची दक्षता घ्यावी. कंत्राटदारांना त्यासंबंधी उपाययोजना करण्याचे निर्देश द्यावेत, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

ठेकेदारांना सूचना द्या - संभाव्य वादळ, अतिवृष्टीचा धोका लक्षात घेता उंच इमारत बांधकामासाठी लावण्यात आलेल्या ट्रेनची दुर्घटना घडू शकते. याची दक्षता घेण्यासाठी संबंधित ठेकेदारांना सूचना द्या. अतिवृष्टीच्या काळात किनारपट्टी भाग कोळीवाड्याची देवाची रास्ता रात्री करण्याची वेळ आल्यास अगोदरच उपाययोजना करून ठेवाव्यात, असे निर्देशही मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिले आहेत.

हेही वाचा - Devendra Fadnavis : भावनिक पळवाट काढू नका.. कायद्याने उत्तर द्या : फडणवीसांचा राऊतांना टोला

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.