ETV Bharat / city

जय भीमचा घोष; चैत्यभूमी परिसरात अनुयायांचे महामानवाला अभिवादन

मुंबईतील आंबेडकरी वस्त्या, बौद्ध विहार हे लाईटिंग, निळे झेंडे यांनी सजल्या आहेत. लाऊड स्पीकरवर आंबेडकरी गीते वाजवली जात आहेत. घराघरात खीर आणि गोड जेवणाचा आस्वाद घेतला जात आहे.

author img

By

Published : Apr 14, 2019, 12:33 PM IST

चैत्यभूमी परिसरात अनुयायांचे महामानवाला अभिवादन

मुंबई - डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२८ व्या जयंतीनिमित्त देशभरात आनंद सोहळा साजरा होत आहे. दादर येथील चैत्यभूमी येथे पहाटेपासून बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आंबेडकरी अनुयायांनी गर्दी केली आहे. राज्यपाल विद्यासागर राव यांनी देखिल चैत्यभूमीवर डॉ. आंबेडकरांना अभिवादन केले. केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले तसेच लोकसभा निवडणुकीचे विविध उमेदवारही बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमी येथे येणार आहेत.

डॉ. आंबेडकर यांची जयंती मध्यरात्री १२ वाजल्यापासूनच अनेक ठिकाणी साजरी करण्यास सुरुवात झाली. सकाळपासूनच आंबेडकरी अनुयायांनी चैत्यभूमी येथे बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी गर्दी करत आहेत. ही गर्दी संध्याकाळपर्यंत वाढत जाईल. जयंतीनिमित्त मुंबईतील विविध ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

मुंबईतील आंबेडकरी वस्त्या, बौद्ध विहार हे लाईटिंग, निळे झेंडे यांनी सजल्या आहेत. लाऊड स्पीकरवर आंबेडकरी गीते वाजवली जात आहेत. घराघरात खीर आणि गोड जेवणाचा आस्वाद घेतला जात आहे. संध्याकाळी आंबेडकर जयंती मिरवणुका काढण्यात येणार आहेत.

जय भीमचा घोष; चैत्यभूमी परिसरात महामानवाला अभिवादन करण्यासाठी अनुयायांची रांग

मुंबई ।

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 128 व्या जयंतीनिमित्त देशभरात आनंद सोहळा साजरा होत आहे. दादर येथील चैत्यभूमी येथे पहाटेपासून बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आंबेडकरी अनुयायांनी गर्दी केली आहे. राज्यपाल विद्यासागर राव, केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले तसेच विविध लोकसभा निवडणुकीचे उमेदवारही बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमी येथे येणार आहेत.

डॉ. आंबेडकर यांची जयंती मध्यरात्री 12 वाजल्यापासूनच अनेक ठिकाणी साजरी करण्यास सुरुवात झाली. सकाळपासूनच आंबेडकरी अनुयायांनी चैत्यभूमी येथे बाबासाहेबाना अभिवादन करण्यासाठी गर्दी केली आहे  ही गर्दी संध्याकाळपर्यत वाढत जाणार आहे. मुंबईतील विविध ठिकाणी ही कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आली आहे.
मुंबईतील आंबेडकरी वस्त्या, बौद्ध विहार लाईटिंग, निळे झेंडे यांनी सजल्या आहेत. लाऊड स्पीकरवर आंबेडकरी गीते वाजवली जात आहेत. घराघरात खीर आणि गोड जेवणाचा आस्वाद घेतला जाणार आहे. संध्याकाळी आंबेडकर जयंती मिरवणूका काढण्यात येणार आहेत.

Video live 007 varun pathavale aahet
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.