ETV Bharat / city

सचिन वाझे प्रकरणी भाजपच्या भूमिकेवर संशय, सत्य जनतेपुढे येऊ द्या - भाई जगताप - भाई जगतापांची सचिन वाझे प्रकरणावर प्रतिक्रिया

मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटक ठेवण्यात आलेल्या वाहनाप्रकरणी मुंबई पोलीस दलातील सचिन वाझे यांना एनआयएने अटक केली आहे. या प्रकरणी भाजपच्या भूमिकेवर संशय असून जे काही असेल ते सत्य नागरिकांसमोर येऊ द्या, असे मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांनी म्हटले आहे.

Bhai Jagtap
Bhai Jagtap
author img

By

Published : Mar 15, 2021, 8:25 PM IST

Updated : Mar 15, 2021, 8:31 PM IST

मुंबई - मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटक ठेवण्यात आलेल्या वाहनाप्रकरणी मुंबई पोलीस दलातील सचिन वाझे यांना एनआयएने अटक केली आहे. या प्रकरणी भाजपच्या भूमिकेवर संशय असून जे काही असेल ते सत्य नागरिकांसमोर येऊ द्या, असे मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांनी म्हटले आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना भाई जगताप

सत्य समोर येऊ द्या -

मुंबईमधील रुग्णालय, कचरा डम्पिंग ग्राउंड समस्या, झोपडीधारकांचे पुनर्वसन, नदी नाल्यांचे रुंदीकरण आदी विविध प्रश्नांवर काँग्रेस शिष्टमंडळाने भाई जगताप यांच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षनेते रवी राजा यांच्या उपस्थितीत पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांची भेट घेतली. या भेटीनंतर भाई जगताप पत्रकारांशी बोलत होते. यावेळी बोलताना सचिन वाझे प्रकरणाबाबत विचारलेल्या प्रश्नावर जगताप बोलत होते. यावेळी बोलताना भाई जगताप म्हणाले, की वाझे यांना एनआयएने अटक केल्याने त्यांचे निलंबन होणे क्रमप्राप्त होते. वाझे यांना एनआयएने अटक केली तेव्हा सुशांत सिंह प्रकरणी असेच झाले होते, याची आठवण झाली. एक इलेक्शन काढले तरी त्यात अद्याप काहीही समोर आलेले नाही. भाजपच्या भूमिकेवर संशय निर्माण झाला आहे. एनआयएला आपले काम करू द्या, मुंबई पोलिसांना आपले काम करू द्या. जे काही असेल ते सत्य नागरिकांसमोर येऊ द्या असे जगताप म्हणाले.
हे ही वाचा - बैल नव्हे हा तर मुलगाच, शेतकऱ्याने वाजत गाजत काढली अंत्ययात्रा
काय आहे नेमके प्रकरण -

मुकेश अंबानी यांच्या घराजवळ जिलेटीन असलेली स्कॉर्पिओ गाडी पार्क करताना एक व्यक्ती पीपीई किट घालून आली होती. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणारी व्यक्ती वाझे होते की दुसरं कुणी? स्कॉर्पिओ पार्क करताना त्यावेळी वाझे तिथं उपस्थित होते का?, याचा तपास एनआयएकडून केला जात आहे. त्यामुळे सचिन वाझे यांना पीपीई किट घालून एनआयए चालायला लावणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे. 25 फेब्रुवारीला मुकेश अंबानी यांच्या घराबाहेरील एक सीसीटीव्ही फुटेज तपास यंत्रणांच्या हाती लागले होते. यामध्ये या कटात सहभागी असलेली इनोव्हा कार अनेकदा अंबानी यांच्या निवासस्थानाच्या परिसरात फेऱ्या मारताना दिसून आली. या इनोव्हा कारमधील ड्रायव्हर बाहेर उतरला होता. त्यावेळी या ड्रायव्हरने ओळख लपवण्यासाठी पीपीई किट घातल्याचे दिसून आले होते. ही व्यक्ती सचिन वाझेच असल्याचा एनआयएला दाट संशय आहे.

हे ही वाचा - गव्यांच्या जोडीचा द्राक्ष बागेत धुमाकूळ; पाहा व्हिडिओ

Last Updated : Mar 15, 2021, 8:31 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.