मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसने ज्याप्रमाणे सांगितले होते त्याप्रमाणे आम्ही मतदान केले आहे. मात्र, राज्यसभेच्या अपयशाचं नारळ आमच्यावर फोडले जात आहे असे, वक्तव्य अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांनी केलं आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut ) यांनी राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये देवेंद्र भुयार यांच्यासह पाच अपक्ष आमदारांची नावे उघड केली होती. याबाबत नाराजी व्यक्त करण्यासाठी देवेंद्र भुयार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार ( Devendra Bhuyar meets Deputy CM ) यांची शासकीय निवासस्थानी त्यांची भेट घेतली. पक्षाने सांगितल्याप्रमाणे मतदान केले आहे. मात्र, मतदान करूनही अशाप्रकारचे आरोप होत आहेत. येणाऱ्या विधानपरिषद निवडणुकांमध्ये ( Legislative Council elections ) महाविकास आघाडीसोबत राहायचं का नाही? याचा विचार करावा लागेल. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी योग्य भूमिका घ्यावी अशी विनंती त्यांनी पवार यांना केली.
शरद पवार करणार चर्चा - भुयार यांनी केलेल्या तक्रारीनंतर शरद पवार ( Sharad Pawar discuss ) संपूर्ण प्रकरणावर चर्चा करणार आहे. अशी, माहिती त्यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देखील भेटीची वेळ मागितली आहे. मात्र, ठाकरे यांचा वेळ अद्याप मिळालेले नाही. काही गैरसमज असले तरी, येणाऱ्या पुढील सर्व निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीलाच मतदान करणार असे भुयार म्हणाले. काल याच मुद्द्यावर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, तसेच शिवसेना खासदार संजय राऊत यांची भेट घेत आपल्या भूमिकेबाबत स्पष्टीकरण दिलं होतं.
हेही वाचा - सिद्धांत कपूर बंगळुरूमध्ये रेव्ह पार्टीतून पोलिसांच्या ताब्यात, ड्रग्ज टेस्टमध्ये आढळला पॉझिटिव्ह
हेही वाचा - Santosh Jadhav Arrest : संतोष जाधव अटक प्रकरणी एडीजी कुलवंत सरंगल यांची पत्रकार परिषद, म्हणाले...