ETV Bharat / city

Empirical data collection : इम्पिरिकल डाटासाठी आडनाव गृहित धरू नका : नाना पटोलेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र - इम्पिरिकल डाटासाठी

ओबीसी आरक्षण पूर्ववत होण्यासाठी आवश्यक असलेला इम्पिरिकल डाटा (Empirical Data) गोळा करताना काही ठिकाणी आडनावावरून जात गृहित धरली (Dont assume surname ) जात आहे. ही पद्धत चुकीची आहे. संबंधितांना सुचना देऊन योग्य ती कार्यवाही व्हावी अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress State President Nana Patole) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र (Nana Patole letter to CM) पाठवुन केली आहे.

Nana Patole
नाना पटोले
author img

By

Published : Jun 18, 2022, 9:52 AM IST

मुंबई: ओबीसी आरक्षणाबाबत नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवले असून यात म्हणले आहे की, ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण पूर्ववत झाले पाहिजे ही काँग्रेसची भूमिका राहिली आहे. ओबीसी संदर्भातील डाटा गोळा करण्याचे कामही सुरु आहे पण आडनावावरून जात ठरवली जात असल्याचा प्रकार गंभीर आहे. एकाच आडनावाचे लोक विविध जातीत आहेत. ही पद्धत शास्त्रोक्त नाही.

या पद्धतीने डाटा गोळा केल्यास ओबीसी समाजाची खरी संख्या समोर येणार नाही व समाजावर अन्याय होईल. ओबीसी समाजावर अन्याय होऊ नये यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जातीने लक्ष घालावे.अशी मागणीही त्यांनी केली आहे. ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळावे म्हणून सर्वांनी लक्ष घातले पाहिजे. ओबीसी संघटना, सर्व राजकीय पक्ष यांनी पुढाकार घेऊन ओबीसी समाजाला न्याय देण्यासाठी अचूक आकडेवारी जमा होईल यात लक्ष घालावे ,असे आवाहन पटोले यांनी केले आहे.

हेही वाचा : Marathwada Eco Battalion : मराठवाडा इको बटालियनला पाच वर्षांची मुदतवाढ; मुख्यमंत्र्यांचा निर्णय

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.