ETV Bharat / city

डोंबिवलीतील 'त्या' रुग्णाची मुंबईत होणार जिनोम सिक्वेन्सिंग चाचणी, पुढच्या आठवड्यात येईल अहवाल

दक्षिण आफ्रिकेसह काही देशांत कोरोनाचा ओमिक्रॉन ( Omicron variant ) हा व्हेरियंट आढळून आला आहे. या पार्श्वभूमीवर परदेशातून डोंबिवलीत आलेला एक व्यक्ती ( Dombivli corona patient ) कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्याची जिनोम सिक्वेन्सिंग चाचणी ( Dombivli corona patient Genome Sequencing ) मुंबई महापालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात केली जाणार असल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी ( Bmc additional commissioner Suresh Kakani ) यांनी दिली.

Kasturba Hospital
कस्तुरबा रुग्णालय
author img

By

Published : Nov 30, 2021, 2:41 AM IST

मुंबई - दक्षिण आफ्रिकेसह काही देशांत कोरोनाचा ओमिक्रॉन ( Omicron variant ) हा व्हेरियंट आढळून आला आहे. या पार्श्वभूमीवर परदेशातून डोंबिवलीत आलेला एक व्यक्ती ( Dombivli corona patient ) कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्याची जिनोम सिक्वेन्सिंग चाचणी ( Dombivli corona patient Genome Sequencing ) मुंबई महापालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात केली जाणार असून त्याचा अहवाल पुढील आठवड्यात येईल, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी ( Bmc additional commissioner Suresh Kakani ) यांनी 'ईटीव्ही भारत'ला दिली.

हेही वाचा - Mamta Banarjee on Mumbai Visit : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी उद्या मुंबई दौऱ्यावर

डोंबिवलीत एक रुग्ण -

राज्यात गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण आढळून आला. गेले पावणेदोन वर्षे कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी राज्य सरकार व आरोग्य विभाग प्रयत्नशील आहे. राज्यातील कोरोना आटोक्यात आला असतानाच परदेशात कोरोना विषाणूचे रुग्ण वाढू लागले आहे. दक्षिण आफ्रिकेसह काही देशांमध्ये ओमिक्रॉन हा विषाणूचा नवीन व्हेरियंट समोर आला आहे. या विषाणूचा प्रसार इतर विषाणूपेक्षा अधिक गतीने होतो. यामुळे जगभरात या विषाणूने भीती निर्माण केली आहे. नव्या विषाणूचा प्रसार राज्यात होऊ नये म्हणून काळजी घेतली जात असतानाच परदेशातून डोंबिवलीमध्ये आलेला एक प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.

कस्तुरबा रुग्णालयात जिनोम सिक्वेन्सिंग -

डोंबिवलीमधील प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आल्याने त्याची जिनोम सिक्वेन्सिंग चाचणी केली जाणार आहे. या चाचणीमुळे प्रवाशाला कोणत्या प्रकारच्या विषाणूची लागण झाली आहे, हे समोर येणार आहे. ही चाचणी मुंबई महापालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात केली जाणार आहे. आज मंगळवारी या रुग्णाचे सॅम्पल जिनोम सिक्वेन्सिंगसाठी मशीनमध्ये ठेवले जाणार आहेत. याचा अहवाल एक आठवड्यात येणार आहे. त्यानंतर या रुग्णाला नेमक्या कोणत्या प्रकारच्या विषाणूची लागण झाली आहे, हे समोर येणार आहे, अशी माहिती काकाणी यांनी दिली.

काय आहे जिनोम सिक्वेन्सिंग ?

बृहन्‍मुंबई महानगरपालिकेच्‍या कस्तुरबा रुग्णालयात विषाणूंचे जिनोम सिक्वेन्सिंग म्हणजेच, जनुकीय सूत्र निर्धारण वैद्यकीय प्रयोगशाळा (नेक्स्ट जनरेशन जिनोम सिक्वेन्सिंग लॅब) स्थापन करण्यात आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते दिनांक ४ ऑगस्ट २०२१ रोजी त्याचे लोकार्पण करण्यात आले होते. यानंतर सदर यंत्रणा वैद्यकीय दृष्ट्या प्रमाणित होवून कार्यान्वित करण्यात आली आहे. अमेरिकेतील इलुम्निया या कंपनीने, अमेरिकेतीलच अल्ब्राईट स्टोनब्रिज ग्रुप (ए.एस.जी. बोस्टन) या संस्थेच्या माध्यमातून एकूण ६ कोटी ४० लाख रुपये किंमतीचे हे २ जिनोम सिक्वेन्सिंग संयंत्र बृहन्मुंबई महानगरपालिकेला दान स्वरुपात दिले आहे. विषाणूंचे जनुकीय सूत्र निर्धारण केल्याने एकाच विषाणूच्या दोन किंवा अधिक प्रजातींमधील नेमका फरक ओळखता येतो. असा फरक ओळखू आल्यानंतर उपचार पद्धतीची नेमकी दिशा स्पष्ट होते. कस्तुरबा रुग्णालयातील जिनोम सिक्वेन्सिंग लॅबमध्ये एकाचवेळी सुमारे ३८४ वैद्यकीय नमुन्यांची तपासणी होऊन ४ दिवसांच्या आत वैद्यकीय निष्कर्ष प्राप्त होऊ शकतात.

हेही वाचा - Minister Jitendra Awhad Interview : 'विरोधकांनी कितीही प्रयत्न केले तरी सरकार हलणार नाही'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.