मुंबई - बॉंम्बस्फोटाशी संबंधीत व्यक्तीशी व्यव्हार केलेले मंत्री मलिक अटकेत आहेत. सरदार शहावली खान, सलीम पटेल यांच्याकडून मलिक यांनी जमिन खरेदी केली आहे. अशा व्यक्तींशी संबंध असतानाही आपण मलिक यांचा राजीनामा घेतला नाही तर हे स्पष्ट आहे की हे सरकार दाऊदच्या दबावाखाली चालले आहे असा आरोप फडणवीस यांनी केला आहे. ते विधानभावनाबाहेर पत्रकारांशी बोलत होते.
सावकारी पद्धतीने बील वसून केले जात आहे
हे ठाकरे सरकार सुलतानी पद्धतीने शेतकऱ्यांची वीज कापत आहे. सर्वत्र सावकारी पद्धतीने बील वसून केले जात आहे. महाराष्ट्र सरकारने हे बंद केले पाहिजे. असे म्हणत हे सरकार निव्वळ कोडगे आहे. (Power outages for farmers) मात्र, आम्ही हा विषय लावून धरणार आहोत. वीज तोडणी-जोडणी सोडा आणि लवकर सर्व शेतकऱ्यांची वीज जोडणी करा अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची केली आहे. दरम्यान, आता मंत्री मलिक यांचा राजिनामा घेतला नाही तर हे सरकार दाऊदच्या इशाऱ्यावर चालत आहे हे स्पष्ट आहे असा आरोप फडणवीस यांनी यावेळी केला आहे.
तुम्ही या सर्वांवर अशीच सुडबुद्दीने कारवाई करणार का?
यावावेळी विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्यावर जी कारवाई झाली आहे, ती निव्वळ राजकीय सुडबुद्धीने कारवाई केली आहे. परंतु, जो खड्डा खोदतो तोच व्यक्ती खड्यात पडतो हे लक्षात ठेवावे असे म्हणत फडणवीस यांनी एकप्रकारे सरकारला इशाराच दिला आहे. (Case Registered Against Pravin Darekar) आज महाराष्ट्रातील लेबर फॅक्ट्रीचे प्रमुख आहेत ते सर्वच राजकीय पक्षाचे नेते आहेत. त्यामुळे तुम्ही या सर्वांवर अशीच सुडबुद्दीने कारवाई करणार का असा प्रश्नही फडणवीस यांनी उपस्थित केला आहे.
जवानांना जसा एक ड्रेसकोड आहे तसाच शाळेचाही एकच गणवेश असावा
हिजाबच्या प्रश्नावर आमचे मत आहे सर्वांना स्वातंत्र्य आहे. मात्र, शाळेसारख्या ठिकाणी सर्वांना जो गणवेश आहे तो वापरात असावा. कारण जवानांना जसा एक ड्रेसकोड आहे तसाच शाळेचाही एकच गणवेश असावा, अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी हिजाबवर विचारलेल्या प्रश्नावर दिली आहे. तसेच, कोणतेही यावर आता कोणत्याही पक्षाने राजकारण करू नये. असही फडणवीस यावेळी म्हणाले आहेत.
हेही वाचा - Hijab Row Verdict : हिजाब हा मुस्लीम धर्माचा अनिवार्य भाग नाही -कर्नाटक उच्च न्यायालय