ETV Bharat / city

कोरोनाबाधित डॉक्टरांमुळे रुग्णसेवेवर कोणताही परिणाम नाही, रुग्णालय प्रशासनाचा दावा - डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह

मुंबईतील जे जे रुग्णालयासह विविध रुग्णालयातील डॉक्टरांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली असली तरी यामुळे रुग्णसेवेवर कोणताही परिणाम झाला नसल्याचा दावा जेजे रुग्णालय प्रशासनाने केला आहे.

doctor-corona-positive
doctor-corona-positive
author img

By

Published : Jan 7, 2022, 9:31 PM IST

मुंबई - मुंबईत कोरोना रूग्णांची संख्या सातत्याने वाढतेच आहे. रुग्णांना सेवा पुरवणाऱ्या रुग्णालयातील डॉक्टर आणि इतर कर्मचारी कोरोना बाधित होत असल्याची माहिती समोर आल्याने रुग्णांसह प्रशासनाची चिंता वाढली होती. मुंबईतील जेजे शासकीय रुग्णालयातील ७० पेक्षा अधिक डॉक्टर कोरोनाबाधित झाले तर महाराष्ट्रात एकूण साडेतीनशे डॉक्टर कोरोना बाधित झाल्याची माहिती समोर आली आहे.

कोरोनाबाधित होणे ही सामान्य परिस्थिती -

रुग्णालयातील डॉक्टरांना कोरोनाची बाधा होणे हे अत्यंत स्वाभाविक आणि सामान्य आहे. दररोज रुग्णालयात येणाऱ्या शेकडो रुग्णां मुळे डॉक्टरला त्याची बाधा होणे स्वाभाविक आहे. मात्र ज्यांना बाधा झाली आहे अशा डॉक्टरांना कोणतीही लक्षणं नाहीत. त्यामुळे घाबरून जाण्यासारखी कुठलीही परिस्थिती नाही, अशी माहिती जेजे रुग्णालय प्रशासनाने दिली.

अनेक डॉक्टरांची चाचणी नकारात्मक -

जेजे रुग्णालयातील सुमारे ७० निवासी डॉक्टर कोरोना बाधित झाले होते. मात्र त्यांची पुन्हा तपासणी केली असता त्यापैकी ४० डॉक्टरांची चाचणी नकारात्मक आली आहे. सर्दी, खोकला झाल्यानंतर तपासणी केली असता ती तपासणी सकारात्मक येण्याची शक्यता अधिक असते. याला फॉल्स पॉझिटिव्ह रिपोर्ट असे म्हणतात. मात्र, यामुळे घाबरून जाण्याचे कोणतेही कारण नाही.

रूग्ण सेवेवर कोणताही परिणाम नाही -

दरम्यान, अनेक डॉक्टर आणि रुग्णालयातील अन्य कर्मचाऱ्यांना जरी कोरोानाची बाधा झाल्याचे समोर आले असले तरीही आमच्याकडे सहाय्यक कर्मचारीवर्ग मोठ्या प्रमाणात आहे. तसेच प्रत्येक विभागातील डॉक्टरांची संख्या ही पुरेशी असल्याने त्याचा रुग्णसेवेवर कोणताही परिणाम झालेला नाही, असा दावा रुग्णालय प्रशासनाने केला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.