ETV Bharat / city

Neelam Gorhe on uday samant attack : खोटे आरोप करून शिवसेनेला बदनाम करू नका - नीलम गोऱ्हे - Neelam Gorhe warn rebel MLAs

बंडखोर आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ला झाला ( attack on uday samant car ) . आमदार तानाजी सावंत यांच्या घराकडे जाताना मार्गावरच सामंत यांच्या गाडीवर हा हल्ला झालाय हा हमला शिवसैनिकांनी केल्याचा आरोप बंडखोरांच्या गटाकडून केला जात असतानाच ( attack by the rebel group says Shiv Sainik ). शिवसेनेच्या नेत्या आणि आमदार नीलम गोरे यांनी शिवसेनेला बदनाम करू नका अशी भूमिका मांडली आहे. जाणून घेऊया सविस्तरपणे

विधान परिषदेच्या उपसभापती, नीलम गोऱ्हे
विधान परिषदेच्या उपसभापती, नीलम गोऱ्हे
author img

By

Published : Aug 3, 2022, 9:56 AM IST

Updated : Aug 3, 2022, 10:01 AM IST

मुंबई - बंडखोर आमदार आणि शिवसेना यातील वाद आता नव्या वळणावर येऊ ठेपला आहे . जस जश्या निवडणूका जवळ येतील तसे हे वाद वाढतील कि काय अशी परिस्थिती आता दिसू लागली आहे. ०२ ऑगस्ट रोजी काल रात्री पुणे येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बंडखोर आमदार उदय सामंत हे देखील जात असताना उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ला झालेला ( attack on uday samant car ) आहे. आमदार तानाजी सावंत यांच्या घराकडे जाताना मार्गावरच सामंत यांच्या गाडीवर हा हमला झालाय हा हमला शिवसैनिकांनी केल्याचा आरोप बंडखोरांच्या गटाकडून केला जात ( attack by the rebel group says Shiv Sainik )आहे. यासंदर्भात शिवसेनेच्या नेत्या आणि आमदार नीलम गोरे यांनी शिवसेनेला बदनाम करू नका अशी भूमिका मांडली ( Do not defame Shiv Sena says Neelam Gorhe ) आहे.

विधान परिषदेच्या उपसभापती, नीलम गोऱ्हे

शिवसेना आणि शिंदे गट संघर्ष टिपेला - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पुणे येथे काल सभा ( CM Eknath Shindes meeting in Pune ) संपल्यानंतर तानाजी सावंत यांच्या घराजवळील कात्रज चौकात ( Katraj Chowk ) अवघ्या काही मिनिटात शिवसैनिकांनी हा हल्ला चढवल्याचा आरोप शिंदे गटाकडून केला जात आहे. पुण्यामध्ये काल शिवसेना आणि शिंदे गट यांच्या सभांचा सपाटा होता . आदित्य ठाकरे यांची देखील सभा होती त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील सभा पुण्यात होती. आदित्य ठाकरे यांच्या सभांना होणारी तुफान गर्दी एक चर्चेचा विषय ठरू लागली आहे . त्याचा परिणाम शिंदे गटावर देखील होत आहे . अनेकांना धडकी भरली आहे. जनतेचा उदंड प्रतिसाद कसा मिळतोय . त्यामुळे शिवसेना आणि शिंदे गट हे आमने-सामने येणार याबद्दलची शंकेची पाल जनतेच्या मनात चूक चुकलीच होती. या सभांमुळे वातावरण तापले होते. रात्री काही हल्लेखोर एकदम उदय सामंत यांच्या गाडी समोर आले आणि गाडीच्या काचा त्यांनी फोडल्याचे सांगितले जाते. या अचानक घडलेल्या प्रकाराने एकदम तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे . हल्लेखोरांनी सभा झाल्यावर, गद्दारी केली म्हणत जोरदार घोषणाबाजी करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

कायदा सुव्यवस्थेचे आव्हान पोलिसांसमोर - एकनाथ शिंदे यांच्यासोबत यांच्याबरोबर गेलेले बंडखोर आमदार आणि माजी मंत्री उदय सामंत यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी आक्रमक हल्ला केला आहे. यामध्ये उदय सामंतांची (Uday Samant) गाडी ही शिवसैनिकांकडून फोडण्यात आलेली आहे. शिवसेना नेते तानाजी सावंत यांच्या घराकडे जाताना हा प्रकार घडलेला आहे. सभा संपल्यानंतर कात्रज चौकात अवघ्या काही मिनिटात शिवसैनिकांनी हा हल्ला चढवलेला आहे. तर यावेळी गद्दारी केली म्हणत जोरदार घोषणाबाजी करण्यात आलेली आहे, त्यामुळे प्रकरणा आता जोरादार तापण्याची शक्यता आहे. तर दुसरीकेड कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं आव्हान हे आता पोलिसांसमोर असणार आहे.

उगाच शिवसेनेला बदनाम करू नका - शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांचा इशारा या संपूर्ण प्रकरणात शिवसेनेच्या संदर्भात जो आरोप केला जात आहे कि, उदय सामंत यांची गाडी ज्या हल्लेखोरांनी फोडली त्यामध्ये शिवसैनिक होते घडलेल्या घटनेबाबत शिवसेनेच्या नेत्या नीलम ताई गोरे यांना विचारले असता त्यांनी सांगितले की,'' उगाच शिवसेनेला बदनाम करू नका शिवसेनेवर काही ही खोटे आरोप करणे तात्काळ थांबवा. काल पुण्यामध्ये आदित्य ठाकरे यांची जी सभा झाली. या सभेमध्ये अनेक नेत्यांची भाषणे झाली ही सर्व भाषणे लोकशाही तत्वांना धरून, लोकशाही चौकटीमधीलच होती. ज्यांनी शिवसेना सोडलेली आहे. त्यांनी न घाबरता निवडणुकीला सामोरे जावे आणि शिवसेनेच्या पदांचा आमदारकीचा राजीनामा द्यावा. त्यामुळे ज्यांना हे आरोप करायचे आहेत. त्यांनी लक्षात ठेवावे ही जोपर्यंत माजी मंत्री उदय सामंत यांच्या गाडीच्या काचा कोणी फोडल्या, गाडीवर हमला कोणी केला याबद्दल सत्य ठोस माहिती समोर येत नाही; तोपर्यंत हा हल्ला शिवसैनिकांनीच केला आहे हे गृहीत धरण काही बरोबर नाही. आरोप करणाऱ्या लोकांनी शिवसेनेवर खोटे नाटे आरोप करू नका ; असा इशाराच नीलम ताई यांनी शिंदे गटाच्या बंडखोर आमदार याना दिलेला ( Neelam Gorhe warn rebel MLAs) आहे . तसेच त्यापुढे असेही म्हणाल्या, 'पोलिसांच्या संपूर्ण तपासामधून ज्या काही बाबी समोर येतील आणि त्यानंतर या संदर्भात बोलणं हे अधिक योग्य होईल. तोपर्यंत आपण शिवसेनेने हा हल्ला केला असे गृहीत धरणे हे काही योग्य नाही असं देखील त्यांनी नमूद केलय.

हेही वाचा - उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ल्याप्रकरणी शिवसेना शहरप्रमुखासह पाच जणांना अटक, मुंबईमधून बबन थोरातांना अटक

Last Updated : Aug 3, 2022, 10:01 AM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.