मुंबई - मालाड रेल्वे स्थानकावर 23 वर्षीय अंध मुलीवर ( wrong information of physical abuse on blind ) बलात्कार झाल्याची घटना रात्री उशिरा समोर आली होती. या प्रकरणी तपास केला असता बोरिवली लोहमार्ग पोलिसांनी धक्कादायक माहिती समोर आली आहे. पीडित अंध मुलीवर बलात्कार झाला नाही. तिने बनाव केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार ऑक्टोबर 2021 मध्ये मालाड रेल्वे स्थानकावर ( physical abuse of blind girl ) पीडित मुलगी रात्री उशिरा पोहोचली. तेव्हा सर्व गाड्या थांबल्या होत्या. रात्री प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर तिचा मुक्काम होता. काही वेळाने एक मुलगा तेथे आला. त्याने तोंड दाबून तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर काही वेळाने दुसरा मुलगा आला. त्याने तिच्यावर बलात्कार ( Physical abuse on rail station ) केला.
हेही वाचा-Medical Officer Murder Case : कौटुंबिक वादातून डॉ. सुवर्णा वाजे यांची पतीकडून हत्या
लातूर शहरात केला तीन महिने मुक्काम-
सकाळी उठल्यावर ती रेल्वेने लातूरला निघाली. लातूर बस स्टँड येथे ३ महिने मुक्काम केला. त्यानंतर ती पुणे येथे आली. मित्राच्या मदतीने तिला नोकरी मिळाली. काम करत असताना तिला कळले की आपला पाळी येत नाही. त्यानंतर ती स्थानिक डॉक्टर, सरकारी डॉक्टरकडे गेली. तेथे डॉक्टरांनी तिला गर्भधारणेची माहिती दिली. पीडित मुलगी अंध असल्याने डॉक्टरांनी पीडितेसोबत एक नर्स पाठविली.
बोरिवली रेल्वे पोलिसांना पीडितेच्या वक्तव्यात आढळला विरोधाभास
पीडितेला ससून रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. पुणे पोलिसांनी मालाड ते पुणे प्रवासाची संपूर्ण कहाणी पीडितेने पोलिसांना सांगितली. त्यानंतर पीडितेच्या तक्रारीच्या आधारे अज्ञात व्यक्तीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी बोरिवली रेल्वे पोलिसांनी नव्याने एफआयआर नोंदवून तपास सुरू केला. जेव्हा पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीची कहाणी ऐकली. तेव्हा पोलिसांना पीडितेच्या वक्तव्यात काही विरोधाभास आढळला.
हेही वाचा-Sword Attack in Kolhapur : कोल्हापुरात तुफान हाणामारी; तलवार हल्ल्यात तिघे जखमी
पुढील कारवाई पुणे ग्रामीण पोलीस करणार-
जीआरपी पोलिसांना तपासादरम्यान महिला वापरत असलेला मोबाइल क्रमांक वेगळा असल्याचे आढळून आले. तर पीडितेने पुणे पोलिसांना दिलेला मोबाइल क्रमांक वेगळा होता. त्यामुळे पोलिसांचा संशय अधिकच बळावला. पोलिसांच्या माहितीनुसार पीडितेचे मित्रासमवेत संबंध होते. त्यामधून गर्भधारणा झाली होती. हे लपविण्यासाठी पीडितेने बनाव केला. या प्रकरणी पुणे ग्रामीण पोलीस कारवाई करणार आहेत.
हेही वाचा-Lata Mangeshkar Live Update : लता मंगेशकर यांची प्रकृती स्थिर - डॉ. प्रतीत सामदानी