ETV Bharat / city

Distribution of Deworming Tablets : मुलांची जबाबदारी पालिका प्रशासनाची, या अटीवर जंतनाशक गोळ्यांचे वाटप सुरू - distribution of deworming pills to children

मुंबई महानगरपालिकेच्या ( Mumbai Municipal Corporation ) आरोग्य विभागाकडून ( Mumbai Municipal Corporation Health Department ) मुलांना जंतनाशक गोळ्यांचे वाटप केले जात ( Distribution of deworming tablets to children by health department ) होते. या गोळ्या वाटप करत असताना त्याची पावडर झाल्याची समोर आली आहे.

Distribution of Deworming Tablets
जंतनाशक गोळ्यांचे वितरण
author img

By

Published : Oct 15, 2022, 5:45 PM IST

मुंबई - मुंबई महानगरपालिकेच्या ( Mumbai Municipal Corporation ) आरोग्य विभागाकडून ( Mumbai Municipal Corporation Health Department ) मुलांना जंतनाशक गोळ्यांचे वाटप केले जात ( Distribution of deworming tablets to children by health department ) होते. या गोळ्या वाटप करत असताना त्याची पावडर झाल्याची समोर आली आहे. यामुळे मुलांवर दुष्परिणाम होण्याची भीती ( Side effects of deworming tablets on children ) असल्याने आरोग्य सेविकांनी या गोळ्यांचे वाटप थांबवले होते. त्यानंतर आरोग्य विभागाशी झालेल्या चर्चेत मुलांवर दुष्परिणाम झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी पालिका प्रशासन आणि आरोग्य विभागाची असेल या अटीवर गोळ्यांचे वाटप करण्यास आरोग्य सेविकांनी सुरुवात केली आहे.

distribution of deworming pills to children
जंतनाशक गोळ्यांचे वितरण

गोळ्या वाटप थांबवले - मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून मुंबईमध्ये विविध मोहिमा चालवल्या जातात. नुकतीच कुष्ठरोग आणि टीबी शोध मोहीम झाल्या नंतर पालिकेच्या आरोग्य सेविकांना मुलांना जंत नाशक गोळ्यांचे वाटप करण्याचे काम देण्यात आले आहे. यासाठी अलबेंडाझोल (Albendazole) या गोळ्या आरोग्य सेविकांना वाटप करण्यास देण्यात आल्या आहेत. या गोळ्या आरोग्य सेविका घराघरात जाऊन वाटप करत असताना गोळ्या पाकिटामधून काढताच त्याची पाऊडर झाल्याचे समोर आले आहे. यामुळे शुक्रवारी (१४ ऑक्टोबरला) आरोग्य सेविकांनी या निकृष्ट दर्जाच्या गोळ्यांचे वाटप थांबवले होते. या गोळ्या लहान मुलांनी खाल्ल्यास त्यांना उलटी झुलाब होण्याची शक्यता आहे. यामुळे आरोग्य सेविकांना जबाबदार धरले जाण्याची शक्यता असल्याने आरोग्य सेविकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते अशी माहिती महापालिका आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष ऍड. प्रकाश देवदास यांनी दिली.

दुष्परिणाम झाल्यास आरोग्य विभागाची जबाबदारी - आज शनिवारी महापालिका आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेची आरोग्य सेविकांसोबत बैठक झाली. काही ठीकाणीच गोळ्या निकृष्ट दर्जाच्या असल्याचे समोर आले आहे. आरोग्य विभागाच्या मुख्य कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांच्याशी चर्चा झाल्यावर गोळ्यांचा नवीन स्टॉक देण्यात आला आहे. या गोळ्या वाटल्यावर मुलांवर कोणतेही दुष्परिणाम झाले तर त्याला सर्वस्वी जबाबदारी पालिका प्रशासन आणि आरोग्य विभागाची असेल असे पत्र देण्यात आले आहे. आरोग्य विभागाने त्याला होकार दिल्यानंतर आज शनिवार पासून जंतनाशक गोळ्यांचे वाटप करण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे असे प्रकाश देवदास यांनी सांगितले.

गोळ्यांचा कोणताही दुष्परिणाम नाही - राष्ट्रीय जंतनाशक कार्यक्रम अंतर्गत, ( Under the National Insecticide Programme ) राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहिमेच्या निमित्ताने १० ऑक्टोबर ते १७ ऑक्टोबर २०२२ या आठवड्याच्या कालावधीत विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या कालावधीत अंगणवाडी, शाळा, महाविद्यालय व शाळा बाह्य मुला-मुलींना जंतनाशक औषधाची गोळी (Albendazole) चे वाटप करण्यात येत आहे. या मोहिमेत १ वर्ष ते १९ वयोगटातील सर्व मुला-मुलींचा समावेश करण्यात आला आहे. या अभियान अंतर्गत दिनांक १० ऑक्टोबर २०२२ ते १३ ऑक्टोबर २०२२ पर्यंत ६५ हजार ९६३ लाभार्थीना गोळ्यांचे वाटप करण्यात आलेले आहे व कोणताही दुष्परिणाम आढळून आलेला नाही. बालकांना कोणतेही लक्षणे आढळले तर त्यांनी जवळच्या आरोग्य केंद्राशी अथवा डॉक्टरांशी संपर्क साधावा असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

मोहिमेची काय आहेत उद्दिष्ट -अंगणवाडी, शाळा, महाविद्यालय व शाळा बाह्य मुला-मुलींना जंतनाशक औषधाची गोळी (Albendazole) चे वाटप करण्यात येते. या मोहिमेत १ ते १९ वयोगटातील सर्व मुला-मुलींचा समावेश करण्यात आला आहे. या वयोगटातील मुला-मुलींना जंतनाशक गोळी देऊन त्यांचे आरोग्य चांगले ठेवणे, पोषण स्थिती, शिक्षण व जीवनाचा दर्जा उंचावणे ही या मोहीमेची उद्दिष्टे आहेत. शालेय आरोग्य विभागाच्या वतीने महानगरपालिका शाळेतील मुला-मुलींची तपासणी, उपचार, समुपदेशन व मार्गदर्शन देखील या कालावधीत करण्यात येते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.