ETV Bharat / city

World Disaster Day : महाविद्यालयीन विद्यार्थांना आपत्ती व्यावस्थापनाचे प्रशिक्षण - college students

महाविद्यालयीन विद्यार्थी ( College student ) नागरिकांना आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याबाबत प्रशिक्षण कार्यक्रम जागतिक आपत्ती दिनाच्या ( World Disaster Day ) निमित्ताने आजपासून प्रशिक्षण ( Disaster Management Training ) कार्यक्रम मुंबई महापालिकेतर्फे सुरु केला आहे.

World Disaster Day
विद्यार्थांना आपत्ती व्यावस्थापनाचे प्रशिक्षण
author img

By

Published : Oct 13, 2022, 9:46 PM IST

मुंबई - जागतिक दर्जाचे शहर असलेल्या मुंबईमध्ये रोज आपत्तीच्या घटना घडतात. यासाठी पालिकेने ( Mumbai Municipality ) महाविद्यालयीन विद्यार्थी ( College student ) नागरिकांना आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याबाबत प्रशिक्षण जागतिक आपत्ती जोखीम घट दिनाच्या ( World Disaster Day ) निमित्ताने आजपासून सुरु केला आहे. हे प्रशिक्षण घेणाऱ्या प्रशिक्षणार्थींनी आपल्या महाविद्यालयात, सोसायटीत जाऊन तेथील किमान १० व्यक्तिंना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण ( Disaster Management Training ) द्यावे. यामुळे आपत्ती व्यवस्थापन अधिक व्यापक स्तरावर साध्य करण्यासोबतच संभाव्य आपत्तींची जोखीम कमी करण्यास मदत होणार आहे,’ असे प्रतिपादन महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी केले.

World Disaster Day
विद्यार्थांना आपत्ती व्यावस्थापनाचे प्रशिक्षण

पहिल्या तुकडीच्या प्रशिक्षणाचा शुभारंभ - संयुक्त राष्ट्र संघाने दरवर्षी १३ ऑक्टोबर रोजी जागतिक आपत्ती जोखीम घट दिन पाळण्याचे निर्देशित केले आहे. या औचित्याच्या निमित्ताने राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या निर्देशांनुसार बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील महाविद्यालयीन विद्यार्थी व नागरिकांना संभाव्य आपत्तींबाबत व्यवस्थापन करणे सोपे व्हावे, यादृष्टीने ५ दिवसांचा एक विशेष प्रशिक्षण कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या पहिल्या तुकडीच्या प्रशिक्षणाचा शुभारंभ आज झाला. या कार्यक्रमाला संचालक (आपत्ती व्यवस्थापन) महेश नार्वेकर, आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाच्या प्रमुख अधिकारी रश्मी लोखंडे तसेच के. सी. महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी प्रशिक्षणार्थी म्हणून मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्याप्रसंगी उपस्थितांशी संवाद साधताना संजीव कुमार बोलत होते.

‘आपदा मित्र’ किंवा ‘आपदा सखी’ - महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाद्वारे महाविद्यालयीन विद्यार्थी, नागरिकांसाठीच्या ५ दिवसीय प्रशिक्षण पूर्ण केलेल्या व्यक्तिंना ‘आपदा मित्र’ किंवा ‘आपदा सखी’ असे संबोधिले जाणार आहे. तसेच हा प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या प्रशिक्षणार्थींना आपत्कालीन व्यवस्थापनाच्या दृष्टीने उपयोगी ठरेल अशा उपयोगी वस्तुंचा एक संच दिला जाणार आहे. या संचामध्ये लाईफ जाकेट, हेल्मेट, प्रथमोपचार साहित्य यासारख्या विविध बहुपयोगी वस्तुंचा समावेश आहे, अशी माहिती महेश नार्वेकर यांनी दिली.

जागतिक नैसर्गिक आपत्ती घट दिन - २२ डिसेंबर १९८९ रोजी संयुक्त राष्ट्र संघाच्या सर्वसाधारण परिषदेने ऑक्टोबर महिन्याची १३ तारीख ही जागतिक नैसर्गिक आपत्ती घट दिन म्हणून निर्देशित केली आहे. सन १९९० ते १९९९ या आंतरराष्ट्रीय नैसर्गिक आपत्ती घट दशकात हा दिवस वार्षिक स्वरुपात पाळावयाचा होता. नैसर्गिक आपत्ती घट, आपत्तींपासून संरक्षण, सज्जता आणि तयारी या मुद्दयांवर जागतिक संस्कृती निर्माण व्हावी, या उद्देशाने हा दिवस पुढेही पाळण्याचा निर्णय २० डिसेंबर २००१ रोजी परिषदेने घेतला. दरवर्षी संयुक्‍त राष्‍ट्र संघामार्फत आंतरराष्‍ट्रीय आपत्ती दिनाकरिता आपत्ती संबंधित विषयाशी निगडीत “मध्‍यवर्ती संकल्‍पना” जाहिर करण्‍यात येते. सन २०२२ करिता ही संकल्‍पना “सन २०३० पर्यंत लोकांसाठी बहु-धोक्यांची पूर्व इशारा प्रणाली आणि आपत्ती जोखीम माहिती आणि मुल्यांकनांची उपलब्धता तसेच प्रवेश लक्षणीयरित्या वाढवणे” ही असणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.