मुंबई - शिवसेना ( Shivsena ) 56 वर्ष पूर्ण करते आहे. नव्या दमाचे नव्या उमेदीचे शिवसैनिक दररोज येत आहेत. मात्र, गद्दारांना शिवसेनेत जागा नाही, असे सूचक वक्तव्य पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray ) यांनी केले होते. मंत्री एकनाथ शिंदे यांच्या नाराजीची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आधीपासूनच कुणकुण लागली होती. त्यामुळेच वर्धापन दिनाच्या भाषणात त्यांनी जोरदार फटकारे मारले होते.
गद्दारांना स्थान नाही - शिवसेना निर्माण करण्यासाठी शिवसैनिकांनी रक्त सांडले, घाम गाळला. त्याचा मला अभिमान आहे. बाळासाहेबांनी जिवाला जीव देणारा शिवसैनिक लागला दिला. मला याचे भाग्य लाभले. उद्याच्या निवडणुकीचे मला अजिबात चिंता नाही. शिवसेनेत आता कोणी गद्दार राहिला नाही, कितीही वाटलं तरी शिवसेनेने इतिहासाला दाखवले आहे, अशीच मागे एकदा फाटाफूट झाली होती. त्यावेळी शिवसेनाप्रमुख म्हणाले होते, आईचे दूध विकणारा नराधम मला शिवसेनेत नको आहे, तो आज काय उद्या सुद्धा मला नको. गद्दारांना शिवसेनेत स्थान नाही, असा सूचक इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला होता. यावरून उद्धव ठाकरे यांना एकनाथ शिंदे यांच्या बंडाळी बाबत आधीच कल्पना असल्याचे बोलले जाते.
भाजपमध्येच जाणार ना - शिवसेनेवर जेवढी संकटे आली त्या त्या वेळी शिवसेना मजबूतपणे उभी राहिली. कोणी जाणार असेल तर तो भाजपमध्येच ना? बिनधास्त जा पण एक लक्षात ठेवा, महाराष्ट्राच्या शहाणपणापुढे सत्याचा माज चालत नाही. शेरास सव्वाशेर असतोच, अशी अशी सूचक टोलेबाजी उद्धव ठाकरे यांनी केली होती.
हेही वाचा - Eknath Shinde : नाराज मंत्री एकनाथ शिंदे सुरतमध्ये.. गुजरात भाजप अध्यक्षांच्या संपर्कात