ETV Bharat / city

धारावी दुसऱ्या लाटेत तिसऱ्यांदा शून्यावर, वर्षभरात नऊ वेळा शून्य रुग्णांची नोंद  

धारावीत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान तिसऱ्यांदा शून्य रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या वर्षभरात धारावीत नऊ वेळा शून्य रुग्णांची नोंद झाली आहे. धारावीत सध्या १० सक्रिय रुग्ण आहेत.

dharavi-recorded-zero-patients
dharavi-recorded-zero-patients
author img

By

Published : Jun 23, 2021, 9:06 PM IST

मुंबई - मुंबईमधील धारावी ही आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी आहे. या झोपडपट्टीत कोरोना विषाणूचा प्रसार झाल्याने गेल्या वर्षी ती हॉटस्पॉट बनली होती. मात्र याच धारावीत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान तिसऱ्यांदा शून्य रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या वर्षभरात धारावीत नऊ वेळा शून्य रुग्णांची नोंद झाली आहे. धारावीत सध्या १० सक्रिय रुग्ण आहेत.

धारावी नऊ वेळा शून्य रुग्ण -

मागील वर्षी मार्च महिन्यात मुंबईत कोरोनाने शिरकाव केल्यानंतर धारावीसारख्या दाटीवाटीच्या झोपडपट्टीही कोरोनाने हॉटस्पॉट ठरली होती. १ एप्रिलला धारावीत पहिला रुग्ण आढळला. त्यानंतर रुग्णांची संख्या वाढत गेली. जुलै-ऑगस्टनंतर धारावीत रुग्ण संख्या घटत गेली. त्यानंतर दोन अंकी असलेली रोजची रुग्णसंख्या एकवर आली. अ‌ॅक्टिव्ह रुग्णांची संख्याही कमी झाली. २४ डिसेंबर २०२० मध्ये पहिल्यांदा, २२ जानेवारी २०२१ला दुसर्‍यांदा, २६ जानेवारीला तिसर्‍यांदा, २७ जानेवारीला चौथ्यांदा तर ३१ जानेवारीला पाचव्यांदा, २ फेब्रुवारीला सहाव्यांदा धारावीत एकही कोरोना रुग्ण आढळला नाही. मुंबई फेब्रुवारीच्या मध्यापासून कोरोनाची दुसरी लाट आली. या लाटेदरम्यान धारावीतही रुग्णसंख्या वाढली होती. मात्र धारावीत १४ जून आणि १५ जूनला एकही रुग्ण आढळून आला नव्हता. आज २३ जूनला पुन्हा धारावीत एकही रुग्ण आढळून आलेला नाही. धारावीत आतापर्यंत नऊ वेळा शून्य रुग्णांची नोंद झाली आहे. धारावीत ६ हजार ८७५ रुग्णांची नोंद झाली असून त्यापैकी ६ हजार ५०६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. धारावीत सध्या १० सक्रिय रुग्ण आहेत.

धारावी मॉडेल -

१ एप्रिल २०२० ला धारावीत पहिला रुग्ण आढळला. त्यानंतर रुग्णांची संख्या वाढत गेली. दाटीवाटीने वसलेल्या धारावीला कोरोनाचा संसर्ग सर्वाधिक होण्याचा धोका होता. रुग्णसंख्या वाढू लागल्याने एका वेळी धारावी ‘कोरोना हॉटस्पॉट' बनली होती. मात्र, पालिकेने संपूर्ण यंत्रणा राबवून विविध उपाययोजना सुरू केली. कोरोना रोखण्यासाठी ‘धारावी पॅटर्न' राबवण्यात आला. ट्रेसिंग, ट्रॅकिंग, टेस्टिंग आणि ट्रिटिंग हे ४ टी मॉडेल, धारावी पॅटर्न, मिशन झिरो आणि धारावीकरांनी दिलेली साथ यामुळे धारावीत कोरोनाचा प्रसार रोखण्यात पालिका प्रशासन आणि आरोग्य विभागाला यश आल्याची माहिती सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी दिली. धारावीत राबवण्यात आलेल्या मॉडेलची चर्चा देशभरात करण्यात आली तसेच हे मॉडेल अनेकठिकाणी राबवण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.