मुंबई - मुंबई बँकेत संचालक मंडळावर असताना दोन हजार कोटींचा घोटाळा केल्याप्रकरणी सध्या विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची ( Pravin Darekar probe in scam ) चौकशी सुरू आहे. सोमवारी चौकशीला जाताना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी तक्रारदार आपचे नेते धनंजय शिंदे यांना अब्रूनुकसानीची नोटीस पाठवणार असल्याचे म्हटले. त्याला धनंजय शिंदे यांनी उत्तर दिले आहे. दरेकरांच्या अब्रुनुकसानीच्या दाव्याला ( Defamation case by Darekar ) मी घाबरत नाही, माझ्याकडे त्यांच्याविरोधात सक्षम पुरावे असल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना होते.
काय म्हणाले शिंदे ?
आपचे नेते धनंजय शिंदे ( Dhananjay Shinde on Pravin Darekar corruption ) म्हणाले, की मुंबई बँकेत मजूर नसताना मजूर प्रवर्गातून अनेक वर्षे प्रवीण दरेकर हे संचालक राहिले ( Pravin Darekar corruption in Mumbai bank ) आहेत. त्यांच्या अध्यक्षपदाच्या काळात झालेल्या २००० कोटींच्या घोटाळ्याचे तपशील लेखापाल नीलेश नाईक ( Auditor Nilesh Naike in Mumbai bank ) यांच्या लेखापरीक्षण अहवालात नमूद आहेत. त्यानुसारच त्यांची चौकशी सुरू आहे. त्यांनी घोटाळे केले म्हणून तर आज चौकशी सुरू आहे. त्यांच्या पक्षाच्या उक्तिनुसार, कर नाही त्याला, डर कशाला? माध्यमात आलेल्या वुत्तानुसार प्रवीण दरेकर हे मला अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार असल्याचे समजले. अजून तरी कुठलीही नोटीस मला प्राप्त झाली आहे. नोटीस येताच त्यावर पत्रकार परिषद घेवून मी स्वतः खुलासा करेल.
प्रवीण दरेकर बिथरले आहेत - वस्तुतः अनेक महिन्यांपासून आम आदमी पक्ष या प्रकरणाचा पाठपुरावा करत होते. राज्य सरकार मात्र धडधडीत पुरावे असतानादेखील कुठलाही गुन्हा दाखल करत नव्हते. शेवटी आम्ही पोलीस ठाण्यात तक्रार केली. प्रवीण दरेकर बिथरले आहेत. त्यामुळेच ते आज अशी भाषा करत आहेत, असे धनंजय शिंदे यांनी म्हटले आहे.
मी घाबरत नाही - धनंजय शिंदे धनंजय शिंदे पुढे बोलताना म्हणाले की, "मुंबई बँक ही मुंबईतील सोसायट्यां मध्ये राहणारे मध्यमवर्गीय, पगारदार कामगार, कर्मचारी, गोरगरीब, कष्टकरी वर्गाची बँक आहे. या बँकेची उत्तरोत्तर प्रगती व्हावी, बँकेतील काही संचालकांचे वर्षानुवर्षांचे गैरव्यवहार थांबावे ही आम आदमी पार्टीची प्रामाणिक भावना असून बँकेवर दरोडा टाकणाऱ्यावर कठोर कारवाई व्हावी अशी आमची मागणी आहे. पोलिस चौकशीला बिथरलेल्या बोगस मजूर प्रवीण दरेकरांच्या कुठल्याही दबावतंत्राला आम आदमी पक्ष मुळीच घाबरत नाही.
हेही वाचा-Silver Oak Attack : सिल्वर ओक हल्ल्यासंदर्भात विशेष शाखेने 4 एप्रिलरोजीच दिला होता इशारा
हेही वाचा-Gunaratna Sadavarte Arrest : गुणरत्न सदावर्ते यांच्या पोलीस कोठडीत दोन दिवसांनी वाढ