मुंबई : अनंत चतुर्दशीच्या दिवशी पुणे, मुंबई आणि कोल्हापूरसह राज्यातील ( DGP New Order And Instructions Regarding Police ) इतर शहरांमध्ये सुरक्षा व्यवस्थेत असलेल्या पोलिसांनी गाण्यावर नृत्य ( DGP Rajnish Seth has Taken Big Decision ) केले होते. त्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल झाले. त्यानंतर पोलिसांवर सर्व क्षेत्रांतून टीका करण्यात आली. आता पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी या घटनेची गंभीर दखल घेत मोठा निर्णय घेतला ( Police Can Not Dance in Public Programme ) आहे.
पोलीस महासंचालकांकडून नियमावली जारी : सार्वजनिक उत्सवांमध्ये पोलिसांचे वर्तन कसे असावे. याबाबत एक नियमावलीच पोलीस महासंचालकांनी जारी केली आहे. त्यामुळे आता पोलिसांनी वर्दीमध्ये नाचू नये. पोलिसांनी गणेशोत्सव काळातील बंधनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. पोलिसांनी वर्दीमध्ये मिरवणुकीत नाचू नये. तसेच, पोलिसांनी महिलांचा अपमान करू नये. पोलिसांनी असामाजिक घटकांच्या कार्यक्रमात सहभाग घेऊ नये, असे राज्यातील पोलीस कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले आहेत.
गणेशोत्सव काळात तसेच इतर कार्यक्रमात पोलीस नाचताना व्हिडीओ : आता नुकत्याच पार पडलेल्या गणेशोत्सव काळात पोलिसांकडून नृत्याचा ठेका धरण्यात आला होता. तसेच, महिला पोलीसदेखील यात सहभागी असल्याचे बरेच व्हिडीओ व्हायरल झाले होते. नाचणे हा काही गुन्हा नाही. परंतु जनेतच्या सुरक्षेसाठी तैनात असणाऱ्या पोलिसांनी त्यात सहभागी होऊन नाचणे यामुळे सुरक्षा सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता असते. त्यामुळे जबाबदार व्यक्तींनी आपल्या कार्याचे, पदाचे भान ठेवून वर्तन करावे. पोलिसांच्या नाचण्यावर टीका झाल्यानंतर याची गंभीर दखल राज्याचे पोलीस महासंचालकांनी घेतली. त्यांनी तत्काळ नवीन नियमावली जारी करून सार्वजनिक कार्यक्रमात पोलीसांचे वर्तन कसे असावे याबाबत आदेश दिले.
रजनीश शेठ यांची कारकीर्द थोडक्यात पाहूया : रजनीश शेठ हे 1988 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी होते. त्यांचा जन्म 29 डिसेंम्बर 1963 रोजी झाला. 25 ऑगस्ट 1988 ला ते पोलीस दलात भरती झाले. रजनीश शेठ यांचे शिक्षण बीए ऑनर्स (एलएलबी) झाले आहे. आझाद मैदान दंगलीच्या वेळी रजनीश शेठ हे मुंबईचे कायदा आणि सुव्यस्था विभागाचे सहपोलिस आयुक्त होते.
रजनीश शेठ हे फोर्स वन महाराष्ट्राचे प्रमुख होते : रजनीश शेठ हे फोर्स वन महाराष्ट्राचे प्रमुख राहिलेले आहेत. गृह विभागाचे प्रधान सचिव म्हणूनही शेठ यांनी जबाबदारी संभाळलेली आहे. राज्याच्या कायदा आणि सुव्यस्था विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक म्हणूनही त्यांनी काम केलं आहे. नुकतीच त्यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली होती. दरम्यान, शांत स्वभावाचे अधिकार म्हणून रजनीश शेठ यांची ओळख आहे. रजनीश शेठ आतापर्यंत कुठल्याच वादात सापडलेले नाहीत.