मुंबई - दिल्लीतून ‘ग्रीन सिग्नल’ न मिळाल्याने मंत्रिमंडळ विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) पुढे ढकलण्यात आला आहे अशी टीका अजित पवार यांनी शिंदे सरकारवर केली (Ajit Pawar on Shinde Government) होती. या टीकेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis Reply to Ajit Pawar) यांनी उत्तर दिले आहे. अजित पवार हे विरोधी पक्षाचे नेते आहेत. ते असे वक्तव्य करणारच, पण ते हे विसरले की महाविकास आघाडी सरकार देखील फक्त 5 मंत्र्यांवरच 30 ते 32 दिवस चालले, असे फडणवीस म्हणाले.
-
On Ajit Pawar's remark that cabinet expansion has been deferred for want of a 'green signal' from Delhi, Maha Dy CM Devendra Fadnavis says, "Ajit Pawar is the oppn leader. He'd make such remarks but for that, he must forget that MVA govt ran for 30-32 days with only 5 ministers." pic.twitter.com/AKiYgujIxI
— ANI (@ANI) August 7, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">On Ajit Pawar's remark that cabinet expansion has been deferred for want of a 'green signal' from Delhi, Maha Dy CM Devendra Fadnavis says, "Ajit Pawar is the oppn leader. He'd make such remarks but for that, he must forget that MVA govt ran for 30-32 days with only 5 ministers." pic.twitter.com/AKiYgujIxI
— ANI (@ANI) August 7, 2022On Ajit Pawar's remark that cabinet expansion has been deferred for want of a 'green signal' from Delhi, Maha Dy CM Devendra Fadnavis says, "Ajit Pawar is the oppn leader. He'd make such remarks but for that, he must forget that MVA govt ran for 30-32 days with only 5 ministers." pic.twitter.com/AKiYgujIxI
— ANI (@ANI) August 7, 2022
मंत्रिमंडळ विस्तारावरून सध्या राज्यातील राजकारण तापले आहे. विरोधक शिंदे सरकारवर टीका करत आहेत. फक्त दोन मंत्री सर्व निर्णय कसे काय घेऊ शकतात? असा प्रश्न विरोधक उपस्थित करत आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार नेमका कधी होणार याची उत्सुक्ता सर्वांनाच लागली आहे. यावरूनच अजित पवार यांनी शिंदे सरकारला डिवचले होते.
अजित पवार यांची शिंदे सरकारवर टीका - विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी पुण्यात शिंदे सरकारवर टीका केली आहे. राज्यातील सर्व अधिकार सचिवाला दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनीसुद्धा सर्व अधिकार मुख्य सचिवांना देऊन राजीनामा द्यावा म्हणून महाराष्ट्र चालेल का?, असे अजित पवार म्हणाले.
हेही वाचा - Ajit Pawar : 'लवकर- लवकर करू नका, मंत्रिमंडळ लवकर करा', विरोधी पक्षनेते अजित पवार यांची शिंदे सरकारवर टीका