मुंबई - राजकारण म्हटले की दबाव तंत्र वापरला जाते. बंडखोर आमदारांनीही राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही असाच आरोप केला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषेदेतील महत्त्वाचा मुद्दा चर्चेत आला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना भर पत्रकार परिषदेत दिलेल्या चिठ्ठीमुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चेला उधाण आले ( sparked political discussion ) आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी मंत्रिमंडळ बैठक घेतली. बैठकीत 8 प्रस्ताव मंजूर करण्यात आले. विशेषतः इंधनावरील कर कमी करून महाराष्ट्रात पेट्रोल ५ रुपये, तर डिझेल तीन रुपयांनी स्वस्त करण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस पत्रकार परिषद घेऊन घोषणा केली. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पेन काढत एका कागदावर काहीतरी खरडले, त्यानंतर तो कागद शिंदेंकडे सरकवला. फडणवीसांची कृती यामुळे चांगलीच व्हायरल झाली आहे. राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनली आहे.
नेमके काय घडले?राज्य सरकारने घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयाची विस्तृतपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माहिती देत होते. देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी अचानक कोटाच्या खिशातील पेन काढून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समोरील पेपर वरती काहीतरी लिहिले. त्यानंतर तो कागद पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सरकवला. शासन निर्णय जाहीर करत असतानाच फडणवीसांनी सरकवलेल्या कागदाकडे शिंदेंनी पाहिले. क्षणभर बघत पुन्हा निर्णय जाहीर करायला सुरुवात केली. मात्र अचानक पेपर समोर आल्याने शिंदे काही काळ अडखळले. तसेच मंत्रिमंडळ निर्णयाकडे पुन्हा एकदा फोकस केले. मात्र फडणवीसांनी सरकवलेल्या कागदाची जोरदार चर्चा रंगली आहे.
शिंदे गटाची भूमिका काय असणार- महाविकास सरकार काळात राष्ट्रवादी काँग्रेसकडून दबाव सुरू होता, असा सूर शिंदे गटाच्या आमदाराने लावला होता. आता हा अनुभव थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांच्याकडून होताना अनुभवायला मिळत आहे. सोशल माध्यमातून आदेश, निर्देश की सूचना असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे. शिंदे गटाकडून अद्याप यावर स्पष्टीकरण आलेले नाही. मात्र शिंदे गटाची भूमिका काय असणार हेदेखील पाहणे महत्त्वाचे आहे.
मंत्रिमंडळाच्या बैठकीत पेट्रोल डिझेलच्या दरात कपात-वाढत्या महागाईने सर्वसामान्यांची परवड झाली आहे. दिवसागणिक इंधनाच्या किमतीत अवास्तव दरवाढ सुरू आहे. पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. शिंदे सरकारने सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी पेट्रोल, डिझेलच्या दरावरील व्हॅट कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. ( Petrol Diesel Prices ) या निर्णयामुळे राज्यात पेट्रोल ५ रुपये आणि डिझेल ३ रुपये प्रति लिटरने स्वस्त झाले आहे. या निर्णयामुळे राज्याच्या तिजोरीवर ६ हजार कोटींचा भार पडेल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
हेही वाचा-Gadchiroli Rain : पूरग्रस्त गडचिरोलीला सर्वतोपरी मदत करणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही
हेही वाचा-CM Eknath Shinde : दौपदी मुर्मू यांना राज्यातील दोनशे आमदार मतदान करणार - मुख्यमंत्री शिंदे
हेही वाचा-Shiv Sena: शिवसेनेला पुन्हा महाविकास आघाडी शक्य? वाचा, काय आहे विश्लेषकांचे मत