ETV Bharat / city

Devendra Fadnavis : महाविकास आघाडी सरकार अक्कलशून्य.. लोकशाही पायदळी तुडवली, फडणवीस आक्रमक

मंत्रालयात गेलेल्या भाजपचे उपाध्यक्ष किरीट सोमय्या ( Kirit Somaiya Viral Photo ) यांना एका अधिकाऱ्याने खुर्ची बसायला दिली होती. त्याला आता नोटीस बजावण्यात आली आहे. यावर विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली ( Devendra Fadnavis Criticized MVA Government ) आहे.

किरीट सोमय्यांचा मंत्रालयातील फोटो व्हायरल

author img

By

Published : Jan 25, 2022, 9:24 PM IST

मुंबई : भाजपचे उपाध्यक्ष किरीट सोमय्या यांना खुर्ची बसायला देणाऱ्या अधिकाऱ्याला नोटीस बजावण्यात आली आहे. फोटो व्हायरल झाल्यावर ही कारवाई करण्यात ( Kirit Somaiya Viral Photo ) आली. यावर आता विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. या अक्कलशून्य सरकारने संपूर्ण लोकशाहीच पायदळी तुडविली आहे, अशा शब्दात फडणवीस यांनी सरकारवर निशाणा ( Devendra Fadnavis Criticized MVA Government ) साधला.

हाच का तुमचा पारदर्शी कारभार?

फडणवीस म्हणाले की, मविआ सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? माहिती अधिकारात फाईलचे निरीक्षण करण्यासाठी गेले तर त्यासाठी थेट माहिती मागणार्‍यालाच नोटीस बजावण्यात आली आहे. किरीट सोमय्यांना नोटीस कसली देता? ही नोटीस द्यायला सांगणार्‍या बोलवित्या धन्यावर कारवाई करा, अशीही मागणी त्यांनी केली. मंत्रालयातील प्रत्येक विभागात सीसीटीव्ही आहेत. हे फोटो कुणी काढले हे जरी शोधले तरी ते प्रसारित कुणी केले, हे सहज स्पष्ट होईल. पण, महाविकास सरकारचे डोके नेहमी उलटेच चालते. सरकारी कर्तव्य बजावणार्‍या कर्मचार्‍यांना सुद्धा नोटीसा देण्यात आल्या आहेत. हाच का तुमचा पारदर्शी कारभार?, अशा शब्दात फडणवीस यांनी राज्य सरकारचा समाचार घेतला. शासनाच्या कार्यालयात जाऊन माहिती अधिकारात माहिती मागणे, फाईलचे निरीक्षण करणे, हा अधिकार सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी दीर्घ लढ्यानंतर सर्वसामान्यांना उपलब्ध करून दिला. एखादी प्रक्रिया माहिती नसेल तर ती जाणून घ्या. केवळ हुकूम सोडून कारवाई कसली करता? असेही ते म्हणाले.

कारवाई अयोग्य : दरेकर

भाजपाचे उपाध्यक्ष किरीट सोमय्या यांना मंत्रालयात खुर्ची बसायला देणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई अयोग्य असल्याचे सांगत सरकारचा निषेध विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर ( Opposition Leader Pravin Darekar ) यांनी केला आहे. भाजपचे उपाध्यक्ष डॉक्टर किरीट सोमय्या यांनी सोमवारी मंत्रालयात जाऊन प्रताप सरनाईक यांना दंड माफी देण्यात आलेल्या फाईलची पाहणी केली. त्यांना फाईल हाताळायला देणाऱ्या आणि खुर्ची बसायला देणाऱ्या अधिकाऱ्याला अखेर नगर विकास विभागाचे मंत्री एकनाथ शिंदे ( Minister Eknath Shinde ) यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्यामुळे सोमय्या यांना खुर्ची बसायला देणे अधिकाऱ्याला महागात पडले आहे. माहिती अधिकाराच्या माध्यमातून एखादा लोकप्रतिनिधी एखाद्या कार्यालयात गेला आणि त्याला सन्मानाने खुर्ची बसायला दिली तर त्यात गैर काय? असा सवाल विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी उपस्थित केला आहे. तसेच सरकारच्या या कृतीचा निषेध करीत असून, अधिकाऱ्यावरील कारवाई थांबवावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.