ETV Bharat / city

Devendra Fadnavis  : इशरत जहाँ, रझा अकादमी, मुंबई बॉम्बस्फोट.. १४ ट्विटद्वारे फडणवीसांचा शरद पवारांवर हल्ला

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी एका पाठोपाठ १४ ट्विट ( Devendra Fadnavis Tweets ) करत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्यावर जोरदार हल्ला चढवला ( Devendra Fadnavis Targets Sharad Pawar ) आहे. शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुस्लिमधार्जिण्या भूमिकेवर ट्विटच्या माध्यमातून टीका केली आहे.

इशरत जहाँ, रझा अकादमी, मुंबई बॉम्बस्फोट.. १४ ट्विटद्वारे फडणवीसांचा शरद पवारांवर हल्लाबोल

author img

By

Published : Apr 14, 2022, 7:25 PM IST

मुंबई : विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज शरद पवार यांच्यावर ट्विटरच्या ( Devendra Fadnavis Tweets ) माध्यमातून जोरदार हल्ला चढवला ( Devendra Fadnavis Targets Sharad Pawar )आहे. शरद पवार यांच्या भूमिकांत बाबत नेहमीच संदिग्ध वातावरण कसे असते? हे त्यांच्या वक्तव्याचा दाखल देत फडणवीसांनी शरद पवारांवर मुस्लिमांच्या लांगुनचालनाचा आरोप लगावला आहे.

तेरावा बॉम्बस्फोट मुस्लिम वस्तीत : मुंबईमध्ये झालेल्या 1993 च्या बॉम्बस्फोटानंतर ( 1993 Mumbai Bomb Blast ) तेरावा बॉम्बस्फोट हा मुस्लीम वस्तीत झाल्याचे पवारांनी खोटे सांगितले होते, असा दावा फडणवीस यांनी केला आहे. काश्मीरला वेगळा दर्जा देण्याबाबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ( Dr Babasaheb Ambedkar ) सुद्धा विरोधात होते. मात्र त्यांचे हे मत दडपून ठेवून कलम 370 बाबत ( Article 370 ) आंबेडकर कसे आग्रही होते हे दाखवण्याचा पवार यांनी सातत्याने प्रयत्न केला. शरद पवार यांनी मतांचे ध्रुवीकरण करण्यासाठी त्यांनी जातीयतेचा आधार घेतल्याचा आरोपही फडणवीस यांनी केला आहे.

  • A thread👇🏻
    On one hand,we are celebrating birth anniversary of Dr.Babasaheb Ambedkar ji,who was against the inclusion of #Article370 granting special status to Jammu & Kashmir.

    But look what is being said going against the wishes&values of Dr.Ambedkar ji!https://t.co/oflzX20wYR

    — Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) April 14, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

रझा अकादमीबाबत मवाळ भूमिका : नवाब मलिक ( Minister Nawab Malik ) हे केवळ मुसलमान असल्यामुळे त्यांचा दाऊदशी संबंध जोडला जातो, असे वक्तव्यही पवार यांनी केले होते. इशरत जहाही निर्दोष असल्याबाबत त्यांनी जाहीरपणे वक्तव्य करत तिची बाजू घेण्याचा प्रयत्न केला होता. मुंबईतील आझाद मैदान येथे अमर जवान ज्योतीला नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला. याबाबत राज्य सरकारला काहीही वाटले नाही. रझा अकादमीबाबत तत्कालीन सरकारची भूमिका अत्यंत मवाळ होती. गृह खाते तेव्हा राष्ट्रवादीकडेच होते, असेही फडणवीस यांनी म्हटले आहे. कोणाला पराभूत करायचे हे अल्पसंख्याक ठरवतील असे जाहीर विधान करून पवार यांनी भडकवणारे भाष्य केले होते. सामाजिक सलोख्याचे आणि शांततेचे वातावरण हवे आहे. असे सांगणाऱ्या पवारांसारख्या लोकांनी दुटप्पी भूमिका का घेतली आहे? काश्मीर फाईल सारख्या चित्रपटाला तथाकथित धर्मनिरपेक्षवाद्यांनी का विरोध केला? असा सवालही या ट्विटच्या माध्यमातून फडणवीस यांनी उपस्थित केला आहे.

हेही वाचा : विक्रांतचा निधी पक्षाला का दिला; शरद पवारांचा सोमैयांना सवाल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.