मुंबई -: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS leader Raj Thackeray) यांच्या १ मे च्या औरंगाबाद सभेनंतर (Raj Thackeray Aurangabad rally) आता राज्यातील जनतेचे लक्ष लागलेय ते राज ठाकरे यांचा अयोध्या दौऱ्याकडे. राज ठाकरे अयोध्येत (Raj Thackeray on Ayodhya Tour) नेमकी कधी जाणार ? त्यांचा दौरा कसा असेल ? ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Raj Thackeray meets Yogi Adityanath) यांची भेट घेणार का ? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. मात्र, यावर आता पूर्णविराम लागला असून मनसेच्या खात्रीशीर सूत्रांकडून या दौऱ्याबाबत विशेष माहिती देण्यात आली आहे.
कसा असेल दौरा ?
मनसेच्या अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज ठाकरे आपले कुटुंबीय व त्यांच्या निवडक कार्यकर्त्यांसह जूनच्या चार तारखेला उत्तर प्रदेशला रवाना होतील. यावेळी त्यांचे पुत्र मनसेच्या विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे व पत्नी शर्मिला ठाकरे ह्या देखील सोबत असतील. राज ठाकरे मुंबईहून लखनऊला जातील. व तिथून ते आयोध्या राम जन्मभूमी येथे दर्शन घेतील. तसेच तेथील काही आखाड्यांना देखील भेट देतील. त्यानंतर या सर्व भेटी झाल्यावर ते पुन्हा आयोध्या ते लखनऊ आणि लखनऊ मधुन पुन्हा मुंबई असा प्रवास करतील. असा त्यांचा आयोध्या दौरा असेल.
हेही वाचा - मनसेचे अस्तित्वासाठी 'राज' कारण
योगी आदित्यनाथ यांची भेट नाहीच
राज ठाकरे आपल्या या दौऱ्यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेणार का ? अशा चर्चांना उधाण आले होते यासंदर्भात मनसेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी देखील आपल्या प्रतिक्रिया दिल्या होत्या. यात त्यांनी हा दौरा मोठा असल्याने योगी प्रशासनाची भेट घ्यावीच लागेल असं म्हटलं होतं. मात्र, आता समोर आलेल्या माहितीनुसार दौर्यात राज ठाकरे योगी आदित्यनाथ यांची भेट घेणार नाहीत. त्या संदर्भात कोणतीही चर्चा झालेली नाही. अशी माहिती मनसेच्या अधिकृत सूत्रांकडून देण्यात आली आहे.
कोणतीही पत्रकार परिषद नाही
राज ठाकरे यांच्या दौऱ्याबाबत ते राम जन्मभूमी येथे दर्शन घेऊन योगी आदित्यनाथ यांना भेटतील व त्यानंतर ते पत्रकारांना संबोधित करतील पत्रकार परिषद घेतील अशा देखील चर्चा सुरू होत्या. मात्र "या दौर्यात राज ठाकरे कोणतीही पत्रकार परिषद घेणार नाहीत. पत्रकारांना तुम्ही सांगा विनंती करा तिथे उगाच पत्रकार परिषदेसाठी थांबू नका. कारण हा दौरा फक्त राम जन्मभूमीच्या दर्शनासाठीचा आहे." असे मनसेकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे, आता राज ठाकरे यांचा आयोध्या दौरा आहे कसा होतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. या दौऱ्यात राज्यभरातून 12 रेल्वे गाड्या सुटणार असून हजारो कार्यकर्ते आयोध्येत जाणार आहेत.
हेही वाचा - Raj Thackeray : अजामीनपात्र वॉरंट असतानाही राज ठाकरे यांना अटक का केली नाही; न्यायालयाची मुंबई पोलिसांना विचारणा