ETV Bharat / city

Devendra Fadnavis React on Vinayak Mete मॅसेज सकाळी वाचला बोलणे अपूर्ण राहिले देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली खंत - विनायक मेटेंचे अपघाती निधन

शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे Shiv Sangram leader Vinayak Mete यांचे मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर भीषण अपघात झाला अपघातात मेटे यांचे निधन झाले मेटे यांच्या निधनानंतर Accidental Death of Vinayak Mete सर्वत्र शोक व्यक्त केला जातो आहे दरम्यान उपमुख्यमंत्री फडणवीस Deputy CM Devendra Fadnavis यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले विनायक मेटेंनी रात्री सव्वादोन वाजता मला मॅसेज पाठवला होता मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बैठक बोलावली आहे त्याच्यासाठी मी येतोय मी फोन केला तेव्हा तुम्ही फ्लाईटमध्ये होतात मी सकाळी तुमच्याशी बोलतो असा उल्लेख मॅसेजमध्ये होता

Devendra Fadnavis React on Vinayak Mete
देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली खंत
author img

By

Published : Aug 14, 2022, 2:16 PM IST

मुंबई आज दिवसाची सुरुवात अतिशय वाईट झाली. विनायक मेटेंनी रात्री सव्वादोन वाजता मॅसेज केला होता. मी सकाळी वाचला आणि बोलणे राहून गेले. ही सल मनात कायम राहून जाईल अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Fadnavis Reaction on Death of Mete यांनी दिली. विनायक मेटे यांच्या अपघाती निधनानंतर फडणवीस प्रसार माध्यमांशी बोलत होते. Shiv Sangram leader Vinayak Mete

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला शोक शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचे मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर भीषण अपघात झाला. अपघातात मेटे यांचे निधन झाले. मेटे यांच्या निधनानंतर सर्वत्र शोक व्यक्त केला जातो आहे. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एमजीएम रुग्णालयात जाऊन मेटे यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. दरम्यान उपमुख्यमंत्री फडणवीस आणि प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. विनायक मेटेंनी रात्री सव्वादोन वाजता मला मॅसेज पाठवला होता. मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बैठक बोलावली आहे त्याच्यासाठी मी येतोय. मी फोन केला तेव्हा तुम्ही फ्लाईटमध्ये होतात. मी सकाळी तुमच्याशी बोलतो असा उल्लेख मॅसेजमध्ये आहे. मी आज तो सकाळी वाचला असे फडणवीस यांनी सांगताना बोलणे अपूर्ण राहिल्याची खंत व्यक्त केली.

मेटे संघर्षातून वर आलेले नेते आजचा दिवस दुःखद घटनेने सुरू झाला आहे. मला सकाळी मॅसेज आला, अपघात झाला आहे. त्यावेळी त्याचे गांभीर्य लक्षात आले नाही. मी माहिती घेतली मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांचे निधन झाल्याचे प्राथमिक माहिती आहे. मुख्यमंत्र्यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. मेटे संघर्षातून आणि गरिबीतून स्वतःच्या जीवावर उभे राहिलेले हे नेतृत्व होते. मराठा आरक्षणाच्या मुद्याचा त्यांचा दांडगा अभ्यास होता. माझ्या अत्यंत जवळचे सहकारी होते. ८ ते १० वर्षे आम्ही जवळून काम केले आहे. चळवळीचा नेता गेल्याने कधी भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या पूर्ण कुटुंबाच्या पाठीशी आम्ही उभे आहोत. शिवसंग्राम परिवारासाठी हा मोठा धक्का आहे अशा शब्दांत उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या दुःखद भावना व्यक्त केल्या.

हेही वाचा Beed Road Accident News पाटोदा मांजरसुंभा रोडवर स्विफ्ट आयशर टेम्पोच्या अपघातात 6 ठार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.