मुंबई - राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे निकाल आज जाहीर झाले. या निवडणुकीतील सर्व नवनिर्वाचित सदस्यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन केले असून, त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. गावकारभाऱ्यांनो, आता मिळालेल्या संधीचं सोनं करा, जय-पराजय विसरून ग्रामविकासासाठी एकत्र या, असे आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी केले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्था लोकशाहीचा पाया भक्कम करणारी आणि महात्मा गांधीजींचे ग्रामविकासाचे स्वप्न सत्यात आणणारी यंत्रणा आहे. या यंत्रणेतील ग्रामपंचायत हा महत्वाचा घटक आहे. या ग्रामविकासाच्या प्रक्रियेत काम करण्याची संधी तुम्हाला मिळाली आहे. गावाचा विकास करण्यासाठी लोकांनी तुमच्यावर विश्वास दाखवला आहे. त्यामुळे तुमची जबाबदारी आता आणखी वाढली आहे. दिवंगत यशवंतराव चव्हाण यांनी दाखवलेल्या विकासाच्या मार्गावर आपल्या गावाला पुढे घेऊन जाण्यासाठी सर्वांनी कटिबद्ध व्हावं. जनतेचा विश्वास सार्थ ठरवत ग्रामविकासाचा आदर्श निर्माण करावा, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
हेही वाचा - जलसंपदा मंत्र्यांच्या सासुरवाडीत राष्ट्रवादीचा उडाला धुरळा, भाजपने रोवला झेंडा
हेही वाचा - अटारी-वाघा सीमेवरील बीटिंग रिट्रिट समारोह रद्द; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय