मुंबई - नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रशांत पर अनुदान म्हणून ५० हजार रुपये परतावा देण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. मात्र हे पैसे अद्याप दिले गेले नसल्याची कबुली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहात दिली आहे. मात्र यावर्षी शेतकऱ्यांना ५० हजार रुपये देण्याचा प्रयत्न राज्य सरकारच्या वतीने करण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.
राज्य सरकारने जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफी योजनेतील ज्या शेतकऱ्यांनी नियमित कर्जफेड केली आहे. अशा शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. मात्र हे अनुदान अद्यापही दिले गेलेले नाही. यासंदर्भात विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज (सोमवारी) सभागृहात प्रश्नोत्तराच्या तासात मुद्दा उपस्थित केला. तर राज्यातील सभा चार हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती आहे. आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी सभागृहात दिले. शेतकऱ्यांना कर्जमाफीतील लाभ कधी मिळणार, शेतकऱ्यांना नवीन कर्ज कधी दिले जाणार याबाबतचे प्रश्नही मुनगंटीवार यांनी सभागृहात उपस्थित केले. याला उत्तर देताना सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी कोरोनामुळे राज्याची आर्थिक स्थिती बिघडली असून ती पूर्व पदावर येतात संबंधित प्रश्न निकालात काढून असे उत्तर दिले. मात्र या उत्तराने विरोधकांचे समाधान न झाल्याने त्यांनी नेमक्या उताराची मागणी केली.
'शेतकऱ्यांना लवकरच ५० हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान'
नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रशांत पर अनुदान म्हणून ५० हजार रुपये परतावा देण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. मात्र हे पैसे अद्याप दिले गेले नसल्याची कबुली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहात दिली. मात्र यावर्षी या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये देण्याचा प्रयत्न राज्य सरकारच्या वतीने करण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.
हेही वाचा - Deputy CM Ajit Pawar on governor : माझे ते विधान राज्यपालांशी जोडू नका - उपमुख्यमंत्री अजित पवार