मुंबई - शहरालगतच्या जमिनी एनए करण्याच्या उपमुख्यमंत्र्यांचा Deputy Chief Minister Devendra Fadnavis निर्णय विकासकांनी सर्वसामान्य नागरिकांच्या हिताचा आहे. तसेच जमीन एनए करण्यासाठी ऑनलाइन यंत्रणा उभी राहणार असल्यामुळे महसूल विभागातील अधिकाऱ्यांचा मुजोरपणा मोडणार decision to NA suburban land beneficial आहे.
जमिनी एनए करण्यासाठी ऑनलाइन यंत्रणा राज्यातील मुख्य शहरालगतच्या जमिनी (एनए) अकृषिक प्रयोजनात उपयोगासाठी करण्याबाबतचा निर्णय लवकरच राज्य सरकार घेणार, असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसांपूर्वी पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना दिली Devendra Fadnavis on NA suburban land आहे. या निर्णयामुळे शेती सोडून इतर वापरासाठी देखील जमीन उपयोगात आणता येणार आहे. या जमिनीचा वापर नागरिकांच्या वास्तव्यासाठी आणि व्यवसाय करण्यासाठी मोठ्या प्रमाणात करता येईल, असं मतही देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. यासोबतच या जमिनी एनए करण्यासाठी महसूल विभागाशी चर्चा करू. सोप्या पद्धतीने विकासकांना मिळवता यावी. यासाठी देखील ऑनलाइन यंत्रणा तयार करणार असल्याचं सांगण्यात आले आहे.
निर्णयाचा विकासकांनी सामान्य नागरिकांना फायदा नव्या सरकारने हा निर्णय घेतल्यास या निर्णयाचा खूप मोठा फायदा आणि सामान्य नागरिकांना होईल, असं म्हटलं जातंय. सध्या मुख्य शहरांमधल्या जमीन जवळजवळ संपलेल्या आहेत. त्यामुळे वास्तव्यासाठी नवीन इमारत बांधायला जागा शोधणे कठीण होते. मुंबई, पुणे, नवी मुंबई यासारख्या शहरांमध्ये घर घेणं किंवा व्यवसायासाठी जागा घेणे, हे सामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. तशीच काहीशी परिस्थिती राज्याच्या इतर महत्त्वाच्या शहरांमध्ये देखील निर्माण झाली आहे. मात्र उपमुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे नवीन रहिवासी इमारती तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात जागा ही विकासकांना उपलब्ध होईल. याचा थेट फायदा विकासकाम सोबतच राज्यातील सर्वसामान्य जनतेला देखील होणार आहे.
मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधीची उपलब्धता सध्या वास्तव्यासाठी लागणाऱ्या घरांच्या किमती जागेच्या वाढत्या दरामुळे वाढत आहे. मात्र या जागा शहरांच्या जवळ उपलब्ध झाल्यास विकासकांना इमारती बांधताना, कमी किमतीमध्ये जागा उपलब्ध झाल्यास सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्यातली घर बांधता येतील. तसेच व्यवसायासाठी गाळे किंवा कार्यालय मोठ्या प्रमाणात उपलब्ध होऊन व्यावसायिकांनाही त्याचा लाभ होईल, असं मत यांनी व्यक्त केल आहे. यासोबतच या निर्णयामुळे मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी देखील उपलब्ध आहे. शेती नंतर बांधकाम व्यवसाय हा सर्वात मोठं क्षेत्र आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात मजुरा सहीत इतर नोकरीच्या संधीही मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतील. असं मत बिल्डर असोसिएशनचे राष्ट्रीय विश्वस्त प्रदीप नागवेकर यांनी व्यक्त केल आहे.
आता जमीन एनए करताना अनेक अडचणी शहरालगतची एखादी जमीन खरेदी करून त्या जमिनीला एनए करण्यासाठी एखाद्या विकासकाला मोठ्या अडचणी समोर येत असते. खास करून महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांकडून अनेक अडचणी तयार केल्या जातात. यामध्ये मोठा भ्रष्टाचार देखील होत असतो. मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जमीन एन ए करण्यासाठी ऑनलाइन यंत्रणा उभारण्याची देखील घोषणा केली आहे. त्यामुळे अधिकृत विकासकाला त्याचा थेट फायदा होईल. महसूल विभागामध्ये असलेल्या अधिकाऱ्यांची मक्तेदारी मोडता येईल. आणि याचा थेट फायदा विकासक आणि सामान्य जनतेला होईल. त्यामुळे राज्यात आलेल्या नव्या सरकारने घेतलेला हा निर्णय अत्यंत फायदेशीर असल्याचे मत प्रदीप नागवेकर यांच्याकडून व्यक्त करण्यात आलं आहे. Deputy Chief Minister Devendra Fadnavis said the decision to NA suburban land beneficial