मुंबई - वीजबिलात सामान्य नागरिकांना दिलासा दिला गेला नसल्याने भारतीय जनता पार्टी आक्रमक झाली असून त्यासाठी पाच फेब्रुवारीला राज्यभरात आंदोलन करणार आहे. मात्र केवळ राजकारण करण्यासाठी भाजपा आंदोलन करत असल्याचा आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. राज्य सरकारने सामान्य शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मोठा निर्णय घेतला असल्याची माहिती त्यांनी दिली.
शेतकऱ्यांना मोठा दिलासा
शेतकऱ्यांची 45 हजार कोटी थकबाकी असताना, शेतकऱ्यांना आता केवळ 15 हजार कोटी रुपये भरावे लागणार असल्याची माहिती त्यांनी दिली. यातील विलंब शुल्क सरकारने माफ केला असल्याचे त्यांनी सांगितले. यातले 15 कोटी स्वतः राज्यसरकार भरणार असून त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
केंद्राने सादर केलेल्या संकल्पाबाबत असंतुष्ट
1 फेब्रुवारीला अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केला. केंद्राचा अर्थसंकल्प कुठेही समाधान करणारा नाही. कोरोनाकाळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, रोजगार बुडाले. मात्र त्यासाठी कुठेही खास तरतूद नाही. मात्र तरीही अशा अर्थसंकल्पाचे सत्ताधाऱ्यांनी समर्थन आहे. आता राज्याचे विरोधक निषेध करतील. ठाणे मेट्रोला निधी द्यायला हवा होता. निवडणुका डोळ्यांसमोर ठेऊन अर्थसंकल्प सादर केला असल्याची टीका त्यांनी केली आहे.