ETV Bharat / city

...तरच शेतकरी रस्त्यावर उतरतो, अजित पवारांचा टोला - farmers agitation news

जर कृषी कायदे शेतकर्‍यांच्या फायद्याचे आहेत, असे केंद्र सरकार बोलत असेल तर शेतकरी या कृषी कायद्याच्या विरोधात रस्त्यावर उतरला नसता, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना लगावला.

ajit-pawar
ajit-pawar
author img

By

Published : Dec 10, 2020, 2:00 PM IST

Updated : Dec 10, 2020, 5:23 PM IST

मुंबई - शेतकर्‍यांच्या पोटाला चिमटा बसल्यावरच तो रागाने रस्त्यावर येतो व आंदोलनात सहभागी होतो. जर कृषी कायदे शेतकर्‍यांच्या फायद्याचे आहेत, असे केंद्र सरकार बोलत असेल तर शेतकरी या कृषी कायद्याच्या विरोधात रस्त्यावर उतरला नसता, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना लगावला. जनता दरबारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार राष्ट्रवादी भवनमध्ये आले असता माध्यम प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी आपले मत व्यक्त केले.

'काहीही स्पष्ट करत नाहीत'

पवारसाहेब कालच राष्ट्रपतींना भेटले आहेत. त्यावेळी त्यांनी या कायद्यावर काय केले पाहिजे, हे सविस्तर मांडले आहे. केंद्रातील वरीष्ठ मंत्री शेतकर्‍यांच्या शिष्टमंडळाशी चर्चा करत आहेत, परंतु तोडगा अजून निघत नाही. केंद्र सरकार कायद्यात काही प्रमाणात बदल करणार असल्याचे सांगत आहे, मात्र स्पष्ट करत नाही, असेही ते म्हणाले.

'केंद्राने हटवादी भूमिका सोडावी'

शेतकरी हे कायदे रद्द करा, अशी भूमिका मांडत आहे. यामध्ये विरोधी पक्षांना राजकारण करायचे नाही. आज थंडीच्या दिवसात शेतकरी आंदोलन करत आहे. या आंदोलनात राज्यातील अनेक शेतकरी सहभागी झाले आहेत. तर मंत्रिमंडळातील राज्यमंत्री बच्चू कडू हे शेतकर्‍यांना घेऊन दाखल झाले आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणावर शेतकर्‍यांची मागणी येते, त्यावेळी केंद्राने हटवादी भूमिका बाजूला ठेवून समंजसपणा दाखवला पाहिजे. १०० टक्के सर्व गोष्टी आम्ही म्हणू तीच पूर्वदिशा हे लोकशाहीत चालत नाही, याची नोंद सत्ताधाऱ्यांनी घेतली पाहिजे, असेही अजित पवार यांनी सांगितले.

Last Updated : Dec 10, 2020, 5:23 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.