मुंबई- मुंबई विद्यापीठात तब्बल बाराहून अधिक प्रकारचे अभ्यासक्रम सुरु असलेल्या पाली विभागाला लवकरच कायमस्वरूपी विभाग प्रमुख मिळणार आहे. यासोबतच या पाली विभागात लेखी आश्वासन विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी यांनी दिले.
पाली विभागातील विद्यार्थी आणि शिक्षकांनी कायमस्वरूपी विभाग प्रमुख द्यावे आणि इतर सोयीसुविधा पुरवाव्यात या मागणीसाठी आंदोलन छेडले होते. त्याची तत्काळ दखल घेत विद्यापीठ प्रशासनाने या विभागातील विभागप्रमुख यासह इतर प्राध्यापकांचे रिक्त असलेले पदही भरण्यासाठीचे लेखी आश्वासन विद्यापीठाचे प्र-कुलगुरू कुलकर्णी यांनी दिले आहे.
मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलात पाली भाषेचे विविध प्रकारचे १२ अभ्यासक्रम सुरू आहेत. ३०० हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यामध्ये तीन वर्षाचा इंटिग्रेटेड बीए सर्टिफिकेट कोर्स, एक वर्ष त्यानंतर पीजीडीएम, एम. फिल आणि पीएचडीसह संशोधनाचे अभ्यासक्रमही सुरू आहेत. या
विभागाचा विद्यापीठाने काही महिन्यांपूर्वी मराठी विभागाच्या विभागप्रमुखाकडे अतिरिक्त कार्यभार दिला होता. मात्र, हे विभागप्रमुख पाली विभागात तज्ञ नसल्याने त्या विषयाचे तज्ञ विभाग प्रमुख नेमण्यात यावे किंवा त्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात होती.
या विभागाला आवश्यकतेनुसार विद्यार्थी तसेच प्राध्यापकांची कायमस्वरूपी नियुक्ती करावी आणि इतर सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी यावेळी प्रा. लक्ष्मण सोनवणे, डॉ.सुनील कांबळे यांच्यासह इतर विद्यार्थ्यांनी होती. कलिना संकुलात पाली विभागाच्या विद्यार्थ्यांनी मुक निदर्शने करून हे एक दिवसाचे आंदोलन छेडले होते.